अभिनेता वृषभ शाह दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

vrushabh shaha
vrushabh shaha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

अभिनेता वृषभ शहा 'वन फोर थ्री' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील जबरा लूक समोर आला आहे. वृषभ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर भेटीस आले असून या पोस्टरमध्ये वृषभ शहाचा चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेता पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात वृषभची असलेली भूमिका पोस्टर पाहूनच कळत आहे. वृषभचा पोस्टरवरील फोटोतील आक्रोश पाहता त्याने चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचा थोडासा अंदाज बांधता येत आहे. 'वन फोर थ्री' चित्रपटात वृषभ अनंता नावाची भूमिका साकारत आहे. राग, द्वेष आणि क्रूरता हे भाव वृषभच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्याच्या या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली असून त्याने १० किलो वजन कमी केले आहे.

शिवाय त्याने या भूमिकेसाठी स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले आहे. स्वभावाने अजाण असलेल्या वृषभकडून खलनायकाची भूमिका करून घेताना दिग्दर्शक योगेश भोसले यांची उडालेली तारांबळ आणि त्यांची मेहनत लवकरच चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटाची धाटणी असलेल्या या चित्रपटातील वृषभचा लूक हा तंतोतंत दाक्षिणात्य दिसत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली आवड जोपासत वृषभ अभिनय क्षेत्रात उतरला आहे.

'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन'निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. दाक्षिणात्य धाटणीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक योगेश भोसले यांनी केले असून या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. दोन बाजू सांभाळल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री शीतल अहिरराव देखील वृषभसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news