राष्ट्रीय

Arms Licence Scam : काश्मिरात ४० ठिकाणी CBI च्या धाडी, अनेक जिल्हाधिकारी गोत्यात

backup backup

श्रीनगर ; वृत्तसंस्था : Arms Licence Scam : बंदूक परवाना प्रकरणात शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात एकाचवेळी ४० ठिकाणी छापे टाकले.

यामध्ये वरिष्ठ आयएएस अधिकारी शाहिद इकबाल चौधरींच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. CBI च्या या छाप्यांमध्ये  (Arms Licence Scam) काही महत्त्वाचे दस्तऐवज हाती लागले आहेत, असे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. शाहिद चौधरी यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे.

२०१९ मध्ये दाखल एका गुन्ह्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. २०१२ ते २०१६ या काळात जम्मू-काश्मीरमध्ये २ लाख बनावट परवाने दिले गेल्याचा आरोप आहे. चौधरी हे २००९ च्या बॅचचे अधिकारी असून सध्या जनजाती विभागाचे सचिव आहेत. ते कठुआ, रियासी, राजौरी, उधमपूर येथे जिल्हा आयुक्त म्हणून कार्यरत होते.

या काळात त्यांनी बनावट नावांवर हजारो बंदूक परवाने दिल्याचा आरोप आहे.

२०२० मध्ये या प्रकरणात आयएएस अधिकारी राजीव रंजन आणि इतरत हुसैन रफिकी या दोन अधिकार्‍यांना सीबीआयने अटक केली होती. हे दोघे कुपवाडा जिल्हा आयुक्त म्हणून काम केले आहे.

श्रीनगरशिवाय अनंतबाग, बारामुल्ला, जम्मू उधमपूर, राजौरी आणि दिल्लीत हे छापे टाकण्यात आले आहेत.

अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जुन्या आणि नव्या घरांत तपासणी केली असून २० गन हाऊसवरही छापा टाकण्यात आला आहे.

सीबीआयच्या शोधमोहिमेत ४ वर्षांत २२ जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकार्‍यांशी हातमिळवणी करून हे रॅकेट चालवले गेल्याचा संशय आहे.

जम्मूत दोन ठिकाणी दिसले पाकचे ड्रोन

जम्मू ः जम्मू जिल्ह्यातील कालुचक आणि कठुआ जिल्ह्यातील पल्लीमोड येथे दोन ठिकाणी संशयास्पद ड्रोन दिसून आले आहे.

या घटनेनंतर जवळपासच्या सर्व सैन्य चौक्यांवर हाय अ‍ॅलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत सीमेपलीकडून २६ वेळा ड्रोन पाठवण्यात आल्याचे सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

कालुचक येथे रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी ड्रोन दिसून आले.

ड्रोन हल्ल्यांचे कारस्थान पाकिस्तानच्या शक्करगड भागातील कंट्रोल रूममधून चालवले जात असल्याचा संशय आहे.

सर्वाधिक बंदूक परवान्यांचे काश्मिरात वाटप

सीबीआय शाहिद इकबाल चौधरी आणि नीरज कुमार या वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी करणार आहे.

तसेच ८ माजी उपायुक्तांचीही चौकशी सुरू आहे. या दोघांवर २ लाख बनावट बंदूक परवाने दिल्याचा आरोप आहे.

सरकारी आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीर बंदूक परवाने देण्यात आघाडीवर आहे.

येथे २०१८ ते २०२० या काळात देशभरात २२८०५ परवाने जारी केले गेले होते, तर यातील १८ हजार परवाने एकट्या जम्मू-काश्मीरमधील आहेत.

म्हणजेच देशातील ८१ टक्के शस्त्र परवान्यांचे जम्मू-काश्मिरात वाटप झाले आहे.

हे ही पाहा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT