Kolhapur Flood 2021: पुणे-बंगळूर महामार्गावर अद्याप चार फूट पाणी; तरुणांनी कॉन्स्टेबलला वाचवले | पुढारी

Kolhapur Flood 2021: पुणे-बंगळूर महामार्गावर अद्याप चार फूट पाणी; तरुणांनी कॉन्स्टेबलला वाचवले

पुढारी ऑनलाईन, कोल्हापूर:  कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे (Kolhapur Flood 2021) शुक्रवारी बंद झालेला पुणे- बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी (Kolhapur Flood 2021)ओसरत असली तरी पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद आहे.

अधिक वाचा:

शिरोली एमअआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधले मंगल कार्यालय, पुणे -बेंगलोर हायवेवर दुतर्फा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली होती.

तावडे हॉटेल कडून ब्रिज वरून बरेचसे नागरिक पायी चालत, तसेच मोटरसायकल, चारचाकीने विरुद्ध दिशेने येण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिस कॉन्स्टेबलला वाचवले

पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र केरबा चौगुले हे कारमधून हाय वे पार करत होते.

पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांची गाडी काही अंतरावर वाहत गेली. गाडीचा दरवाजा उघडून गाडीवर उभारले.

ते एका झाडाला धरून थांबले. बोट लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकली नसल्याने स्थानिक सामाजिक तरूण कार्यकर्ते, यांच्यासह मच्छिमार समीर सनदे याच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर तीन तासांनी त्यांना वाचवण्यात यश आले.

त्याचबरोबर मोटारसायकल व चालत २०-२५ नागरिकांना या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

अधिक वाचा:

त्यामुळे हजारो वाहने मार्गावर काल सायंकाळपासून अडकून आहेत. याशिवाय कार, टेम्पो लांब पल्ल्याच्या बसेस निमआराम बसेस जागेवर थांबून आहेत.

महापुरामुळे रस्त्यावर अडकून पडलेल्या साडेचारशे वर वाहनधारक कामगार प्रवाशांची शिरोली एमआयडीसीमधील मदरसामध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि त्यांचा संपूर्ण फौजफाटा तैनात होता.

अधिक वाचा:

शुक्रवारी परिसरातील पूर भागातील हालोंडी, शिये गावात ही पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

तिसरी वेळ

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी येण्याची ही तिसरी वेळ आहे. या आधी २००५ व २०१९ साली तर आज (दि. २३)आले असल्याने वाहतूक बंद झाली आहे.

पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पुराचे पाणी रस्त्यावर आले.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गालगतच खाली तीन फुटांपर्यंत पाणी पातळी होती.

पण दीड वाजता पाणी पातळीत उच्चांकी वाढ झाली. त्यामुळे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीची तारांबळ उडाली.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात

Back to top button