माचू पिचू : जागतिक आश्चर्य असणाऱ्या ‘ढगातल्या शहरा’विषयी माहितीय का? 

माचू पिचू : जागतिक आश्चर्य असणाऱ्या ‘ढगातल्या शहरा’विषयी माहितीय का? 
Published on
Updated on

[visual_portfolio id="12251"]
अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : माचू पिचू हे जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानलं जातं. हे शहर दक्षिण अमेरिकतील पेरु देशात आहे. समुद्र सपाटीपासून तब्बल २ हजार ४३० मीटर उंचीवर हे माचू पिचू हे शहर वसलेलं आहे. उरूबाम्बा पर्वतात हे अख्खं शहरच वसलेलं आहे. इंका संस्कृती या शहरात नांदत होती.

१९११ म्हणजे साधरण १०० वर्षांपूर्वी या शहराचा शोध लागला. जुलै २००७ मध्ये जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये माचू पिचू शहराचा समावेश करण्यात आला. या शहराचा एक वेगळा रहस्यकारक इतिहास आहे… चला व्हर्च्युअली का होईना 'माचू पिचू' शहराची सैर करून येऊ आणि तिच्याविषयी जाणून घेऊ…

हे आहे जागतिक आश्चर्य असणारं ढगातलं शहर माचू पिचू
हे आहे जागतिक आश्चर्य असणारं ढगातलं शहर माचू पिचू

माचू पिचूचा शोध कसा लागला? 

१९११ सालच्या दरम्यान अमेरिकेचा इतिहासकार हिराम बिंघम आणि त्याची टीम 'माचू पिचू' शहरातील स्थानिक लोकांशी भेटले. कुजकोपासून उरूबाम्बा पर्वतात जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. वाटेत त्यांना एक स्थानिक शेतकरी भेटला. त्याने पर्वतावर असणाऱ्या शहराबद्दल सांगितले. २४ जुलै १९११ रोजी मध्ये थंडीमध्ये त्या पर्वतावर कूच केली.

बिंघम शेतकऱ्यांच्या एका समुहाला भेटला. त्यांनी शहरापर्यंत जाण्याच्या मार्ग दाखवला. वाटेत पुन्हा त्यांना एक ११ वर्षांचा मुलगा भेटला. त्या मुलाने बिंघम आणि त्याच्या टीमला त्या शहरावर घेऊन गेला. पहिल्यांदा बिंघम माचू पिचू शहरात पोहोचला. त्याला पहिल्यांदा विशिष्ट पद्धतीनं बांधलेलं दगडांचं छत असलेल्या इमारती दिसल्या.

इतक्या उंचीवर असलेलं सुंदर शहर आणि १५० हून अधिक असलेल्या इमारती पाहून आवाक् झाला. त्याने उत्साहाच्या भरात शोध लावलेल्या या शहरावर एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव 'इंका संस्कृतीचं हरवलेलं शहर' होतं. त्यात त्यानं सविस्तर लिहिलं. खरंतर बिंघमच्या पूर्वीदेखील १९ व्या आणि २० व्या शतकात मिशनरी आणि संशोधक त्या ठिकाणावर गेले होते. मात्र, त्यांनी याबद्दल काही लिहून ठेवलं नाही.

बिंघमने या शहरात सापडलेल्या ४००० हून जास्त इंका संस्कृतीतील कलाकृती सोबत घेऊन अमेरिकेला आला. त्यावर पैरू देशाने आक्षेप घेतले. त्या कलाकृती पेरू देशाच्या आहेत, असा दावा केला. तो वाद खूप वर्षे चालला. शेवटी अमेरिकेने माघार घेत पेरू देशाबरोबर २०१० मध्ये एक करार केला. २०११ साली त्या कलाकृती पेरूला परत देऊन टाकल्या.कुझको शहरातील एका संग्रहालयात त्या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत.

सपाटीपासून तब्बल २ हजार ४३० मीटर उंचीवर हे माचू पिचू हे शहर वसलेलं आहे.
सपाटीपासून तब्बल २ हजार ४३० मीटर उंचीवर हे माचू पिचू हे शहर वसलेलं आहे.

माचू पिचू शहराचा इतिहास काय?

या शहराचा इतिहास असं सांगतो की, इसवी सन १४३८ ते १४७२ दरम्यान इंका संस्कृतीचा प्रमुख 'पचक्युटी' नावाच्या प्रशासकाने माचू पिचू शहर निर्माण केले. नंतरच्या काळात 'लाॅस्ट सिटी ऑफ द इंका' या नावानेही ओळखलं गेलं. खूप इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीचे तर्कवितर्क मांडले जातात.

कोण म्हणतं ते एक तुरूंग आहे… कोण म्हणतं ते व्यापारी केंद्र आहे… कोण म्हणतं पिकांच्या निगराणीसाठी तयार केलेली प्रयोगशाळा आहे… कोण म्हणते केवळ राजाच्या राज्याभिषेकासाठी निर्माण करण्यात आलेलं शहर आहे.

१४३० मध्ये इंका संस्कृतीतील लोक माचू पिचू पर्वतावर येऊन वस्ती करून राहू लागले. नंतरच्या काळात स्पेनने इंका साम्राज्यावर आक्रमण केले. हे शहर जिंकून घेतले. परंतु, नंतरच्या काळात स्पेननेदेखील हे ठिकाण सोडून गेले.

माचू पिचू हे जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानलं जातं. हे शहर दक्षिण अमेरिकतील पेरु देशात आहे.
माचू पिचू हे जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानलं जातं. हे शहर दक्षिण अमेरिकतील पेरु देशात आहे.

माचू पिचू शहाराबद्दल खास गोष्टी कोणत्या आहेत?

या शहराला ढगातलं शहर असं म्हंटलं जातं. ८००० फूट उंचीवर माचू पिचू आहे. संपूर्ण इमारती दगडांनी बांधलेल्या आहेत. तिथं छतदेखील दगडांच्याच होत्या. या इमारती बांधताना केवळ अन् केवळ दगडांचाच वापर केला आहे. चुना किंवा इतर तत्सम पदार्थ त्यात वापरले गेले नाही. दगडांच्या भिंतीची रचना अशापद्धतीने केली आहे की, दोन दगडांच्या मधून पातळ ब्लेडदेखील जाऊ शकत नाही. या परिसरात कायम भूकंप होत असतात. तरीही एक दगड जागचा हलत नाही.

या शहाराबद्दल एक थेअरी सांगण्यात आली की, हे शहर माणसांचा बळी देण्यासाठी तयार करण्यात आली होती. कारण, त्यांचे शव व्यवस्थितरित्या पुरण्यात आले नव्हते. तिथं मोठ्या प्रमाणात न पुरलेले शव सापडले आहेत.असं सांगितलं जातं की, १५ व्या शतकात इंका साम्राज्याच्या सम्राटच्या राजमहालात जे कोणी कर्मचारी होते. त्यांची सेवा पूर्ण झाली की, त्यांना तिथं नेऊन पुरलं जात होतं. असंही सांगितलं गेलं की. राज्यातील कर्मचाऱ्यांचे कब्रस्तान असावं. त्यांची सेवा पूर्ण झाली की, त्यांना मारून तिथं पुरलं जात असे.

'माचू पिचू' या शब्दाचा अर्थ आहे 'जुने पर्वत'. त्याचा सरळ संबंध इंंका संस्कृतीशी होता. पण, हे ठिकाण रहस्यमय गोष्टींनी भरलेलं आहे. त्यामुळे नेमकं इथं काय होतं, हे सांगताना ताळमेळ नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांच्या शरीराचे सापळे सापडलेले आहेत. त्यावरून असा तर्क मांडण्यात आला आहे की, इथं सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी महिलांचा बळी दिला जायचा. या महिला अविवाहित आणि व्हर्जिन असायचा.

महिलांच्या सापळ्यावरून संशोधकांनी सांगितलं की, या व्हर्जिन तरूणी सूर्यदेवाला आपलं जीवन समर्पित करण्याच्या इच्छा व्यक्त करत असत. त्यामुळे त्या या टेकडीवर आपला बळी देण्यासाठी येत होत्या. पण, काही वर्षांनंतर आणखी उत्खनन करण्यात आलं. त्यात व्हर्जिन पुरूषांचेदेखील सापळे सापडले. त्यावरून असं सांगण्यात आले की, केवळ महिलांचाच बळी दिला जात नव्हता, तर पुरूषांचादेखील बळी दिला जात असे.

पहा व्हिडीओ : कपिलेश्वर-सुमारे ९०० वर्षं जुनं कोल्हापुरचं ग्रामदैवत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news