मुसळधार पाऊस: शिरोलीतील महामार्गावर पाणी; पुण्याकडे जाणारी वाहतुक बंद | पुढारी

मुसळधार पाऊस: शिरोलीतील महामार्गावर पाणी; पुण्याकडे जाणारी वाहतुक बंद

शिये; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक मार्गावर पुराचे पाणी आल्याने ते वाहतुकीस बंद झाले आहेत.

आज (दि. २३) दुपारपासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरही पुराचे पाणी आले आहे. परिणामी वाहतुक बंद करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

अधिक वाचा :

परिसरातील पूर भागातील हालोंडी, शिये गावात ही पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यानी सांगली फाटा येथे भेट देवून आढावा घेतला.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी येण्याचा तिसरी वेळ आहे. या आधी २००५ व २०१९ साली तर आज (दि. २३)आले असल्याने वाहतुक बंद झाली आहे. पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पुराचे पाणी रस्त्यावर आले.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गालगतच खाली तीन फुटांपर्यंत पाणी पातळी होती. पण दीड वाजता पाणी पातळीत उच्चांकी वाढ झाली. त्यामुळे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीची तारांबळ उडाली. महामार्गावरील वहातुक बंद होणार याची वार्ता सर्वत्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरल्याने शिरोली एमआयडीसीत कामावर आलेल्या लोकांनी काम बंद करून घरी जाणे पसंत केले.

अधिक वाचा :

त्यामुळे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. परिसरातील नागरिकांनी पुराच्या पाण्याची छायाचित्रे काढण्यासाठी व पाहण्यासाठी गर्दी केली होती.

शिरोली पोलिसात ठाण्याच्या हद्दीत येणार्या पुर परिसराचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यानी सांगली फाटा येथे येवून शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांचेकडून परिसरातील पुर परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी हालोंडी, शिये, शिरोली येथील नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले आहे.

दरम्यान, शिरोली जवळ महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतुक पुर्ण बंद केली आहे.

अधिक वाचा :

Back to top button