विदर्भ

चंंद्रपूर : पिकअपच्या अपघातात एक महिला मृत्यूमुखी, १३ जखमी

सोनाली जाधव

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : उपरी (ता. सावली) येथील मजूर सोयाबीन काढणीच्या कामाकरिता बुलढाणा जिल्ह्यात पिकअप वाहनाने जात असताना सावली येथील महाकाली नगरी जवळ वाहनाचा अपघात गुरुवार, रात्री १० च्या सुमारास झाला.

  एक महिला ठार तर १३ जखमी

या अपघातात एक महिला ठार तर महिला ठार तर १३ जखमी आहेत. जखमीपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव लताबाई टिकाराम थोरात (वय-५५) ठार असून, १३ जखमी झाले आहेत.

उदरनिर्वाह करिता शेतमजुरी. 

सावली परिसरातील शेतीच्या हंगामाची कामे संपत आलेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील मजूरवर्ग कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता परप्रांतात व परजिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या कामाकरिता जात असतात. उपरी येथील १४ मजूर गावातीलच पिकअप वाहन क्रमांक MH-३४ BG – ९०५४ या वाहनाने बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या कामाकरिता निघाले होते.

 भरधाव येणार्या वाहनाला चुकवताना अपघात.

वाहन भरधाव वेगाने जात असताना सावली येथील महाकाली नगरी जवळ समोरून वाहन येत आहे हे लक्षात येता असता  वाहन चालकाने वाहन बाजूला घेत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटले.

चौघांची प्रकृती चिंताजनक 

त्यात लताबाई टिकाराम थोरात यांचा मृत्यू झाला तर संगीता जगदीश रोहणकर (३५), सुरज टिकाराम थोरात (२३),  पुरुषोत्तम बोदलकर (५०), पुष्‍पाबाई पुरुषोत्तम बोदलकर (४५), रोशन दिवाकर कोठारे (३०), नीलिमा रोशन कोठारे (२८), जनार्धन तुकाराम कुडकर (४५), उषा सातपुते (४५), स्वामीना जगदीश रोहणकर (19), विकेश चोखाजी बारसागडे (२८), संजय बाजीराव भोयर (४३), रामचंद्र सातपुते (५२), ललिता बाळू कोटगले (४०)अशी जखमींची नावे आहेत. सर्वांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

परंतु चार मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पुढील तपास पो.उप.नि. श्री. शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री. चिचघरे, श्री. दीपक जाधव करीत आहेत.

हा व्हि़डोओ पाहिलात का ? जेव्हा आपल्या माणसाचं बोलणं न बोलताच आपल्याला कळतं…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT