वर्धा ; पुढारी वृत्तसेवा : अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून ११ जणांना जलसमाधी मिळाली. मृतांमध्ये तारासावंगा येथील पाच जणांचा समावेश आहे. ११ जणांना जलसमाधी मिळाल्याच्या हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यातील तारासावंगा गाव सुन्न झाले आहे. खंडाळे, वाघमारे आणि मटरे कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडेगाव येथील मटरे कुटुंबाकडे असलेल्या दशक्रियेच्या विधीसाठी नातलग आले होते.
दशक्रिया विधी आटोपल्यानंतर १४ सप्टेंबर रोजी ते श्रीक्षेत्र झुंज येथे महादेव मंदिरात दर्शनार्थ आले होते.
या ठिकाणी कमी उंचाची धबधबा असून पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. यावेळी ११ जण नावेत बसले.
सकाळी दहा वाजताच्या सुमारास नाव उलटली. त्या नावेत वर्धा जिल्ह्याच्या तारासावंगा येथील मोना सुखदेव खंडाळे (वय१२), आदिती सुखदेव खंडाळे (वय१३), अश्विनी अमर खंडाळे (वय २१), वृषाली अतुल वाघमारे (वय २०), अतुल गणेश वाघमारे (वय २५) हेही होते या घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसला.
तारासावंगा येथील पाच जण या घटनेत बुडाले असून सर्वांचाच शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेमुळे गाव सुन्न झाले आहे.
प्रशासनाकडून बचावकार्य आणि शोध मोहीम सुरू आहे.
तारासावंगा येथील एकाचाही शोध लागलेला नव्हता.
घटनास्थळी अमरावती, नागपूर येथील पोलिस, आमदार देवेंद्र भूयार, आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत, आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे, तलाठी गायत्री महाजन, पांयत समितीचे उपसभापती गोविंद खंडाळे उपस्थित होते.
हेही वाचलं का ?