अफगाणिस्तानात बंदूक दाखवून भारतीय व्यापाऱ्याचे अपहरण - पुढारी

अफगाणिस्तानात बंदूक दाखवून भारतीय व्यापाऱ्याचे अपहरण

पुढारी ऑनलाईन डेस्क: अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर अल्पसंख्यांक नागरिक भीतीच्या छायेत असून काबूलमध्ये बंदुकीच्या धाकावर एका भारतीय व्यापऱ्याचे अपहरण केले आहे.

इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंढोक यांनी सांगितले की, काबूलमध्ये अफगाण वंशाचे भारतीय व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकाने अपहरण करण्यात आले. व्यावसायिकाचे नाव बंसरी लाल अरेन्देही आहे. बंसरी हे शीख समुदायातील आहेत.

बंसरी यांचे काबूलमध्ये औषध उत्पादनांचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाजवळून त्यांचे अपहरण करण्यात आले.

बंसरी यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांचेही अपहरण केले मात्र, कर्मचाऱ्यांनी आपली सुटका करून घेतली.

अपहरणकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.

बंसरी हे कुटुंबीयांसं दिल्ली-एनसीआरमध्ये वास्तव्यास आहेत. स्थानिक तपास यंत्रणांनी बंसरी यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली असून त्यांच्या शोध घेतला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button