परप्रांतीयांसाठी भाजप आक्रमक! मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांना कडाडून विरोध | पुढारी

परप्रांतीयांसाठी भाजप आक्रमक! मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांना कडाडून विरोध

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : परप्रांतीयांसाठी भाजप आक्रमक : साकीनाका बलात्काराच्या घटनेच्या मुद्यावर गृहविभागासोबत घेतलेल्या बैठकीत परप्रांतीय कुठून येतात कुठे जातात यांचा हिशोब ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिल्याने भारतीय जनता पक्ष संतप्‍त झाला असून मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशांना तीव्र आक्षेप घेतला आहे.

साकीनाका बलात्कार व हत्या प्रकरणी सोमवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पोलीस प्रशासनाची बैठक घेतली. महिलांवरील अत्याचार रोखणयासाठी पोलीस प्रशासनाला त्यांनी जे निर्देश दिले त्यातील दोन निर्देशन वादाचा विषय ठरले आहेत. इतर राज्यातून येणार्‍यांची नोंद ठेवावी. ते येतात कुठून, जातात कुठे यांची माहिती ठेवावी.

गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळे रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा, असे
मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिसांत तक्रार गुन्हेगार गुन्हेगार असतो, तो मराठी किंवा परप्रांतीय कसा असू शकतो, असा मुद्दा मांडत भाजपने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांना तीव्र आक्षेप घेतला.

प्रांतीय नागरिकांची हिशोब ठेवण्याबाबत वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमत्र्यांविरोधात153-अ अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.

मुख्यमंत्र्यांच्या परप्रांतीयविरोधी वक्तव्याला प्रसिद्धी देणार्‍या सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राउत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा,असेही भातखळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

परप्रांतीयांसाठी भाजप आक्रमक : हे नेते परप्रांतीय आहेत काय?

राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे सोडून ठाकरे सरकार वसुली करण्यात मग्न आहे, राज्यात दिवसागणिक बलात्कार व महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होत असताना व ठाकरे सरकारमधील मंत्री व नेतेच बलात्कारी असताना सुद्धा मुख्यमंत्री मात्र परप्रांतीय नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नगरसेवक नामदेव भगत, शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने, नालासोपार्‍याचे शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाले आहेत, हे सर्व शिवसेनेचे नेते परप्रांतीय आहेत का? असा सवाल आ. भातखळकर यांनी केला.

मागील सात महिन्यात एकट्या मुंबई शहरात 550 महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत, धक्कादायक म्हणजे यात तब्बल
323 अल्पवयीन मुली सुद्धा आहेत. यातील किती आरोपी परप्रांतीय आहेत याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा असा सवालही भातखळकर यांनी केला. चार दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button