Pune Municipal Elections 2025 Pudhari
पुणे

Pune municipal ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर; हजारोंपैकी 1398 हरकतींची दखल

महत्त्वाचे प्रभाग बदलले; भाजपसाठी अनुकूल रचना झाल्याचा आरोप, आरक्षण प्रक्रियेलाही बसणार परिणाम

पुढारी वृत्तसेवा

प्रभागरचनेतील महत्त्वाचे बदल

पुणे महानगर पालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर घेतलेल्या 5 हजार 922 हरकतींपैकी निवडणूक आयोगाकडून 1329 हरकतींची पूर्णतः आणि 69 हरकतींची अंशत दखल घेण्यात आली आणि त्यानुसार अंतिम प्रभागरचनेत बदल करण्यात आले. महापालिकेची ही अंतिम प्रभागरचना शनिवारी (दि.4) जाहीर झाली. प्रारूप प्रभागरचनेत हे बदल पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दिसून येत आहे. अंतिम प्रभागरचनादेखील भाजपच्या दृष्टीने अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले, मध्यवर्ती पेठेसह उपनगर परिसरातील प्रभाग भाजपला फायदेशीर ठरतील, अशी रचना केल्याचा आरोप होत आहे.(Latest Pune News)

प्रभागरचना तयार करताना नदी, नाले, डोंगर या नियमाला डावलल्याचा आरोपदेखील केला होता. या प्रभागरचनेवर तब्बल 5 हजार 922 हरकती नोंदवल्या होत्या. या बदलांचा आगामी आरक्षण प्रक्रियेवरही परिणाम होणार असल्याच्यादेखील तक्रारी केल्या होत्या.

प्रारूप प्रभागरचनेवर मागविलेल्या हरकती सूचनांवर आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली होती. याचा अहवाल नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला. निवडणूक आयोगाने याचा विचार करत 1329 पूर्णत: तर 69 सूचना अशंत: मान्य केल्या. प्रामुख्याने कोंढवा बुद्रुक-येवले वाडी (40), अप्पर सुपर इंदिरानगर (39), नऱ्हे- वडगाव बुद्रुक (34), बालाजी नगर-आंबेगाव -कात्रज (38) या प्रभागावर अधिक लक्ष असल्याचे दिसून आले.

विमाननगर-लोहगाव प्रभाग क्र.3

विमाननगर-लोहगावकरांसाठी ही महापालिकेची पहिलीच निवडणूक आहे.

या प्रभागाची एकूण लोकसंख्या 92410 आहे. त्यापैकी 10082 एससी आणि 1017 एसटी नागरिकांचा समावेश आहे.

लोहगावचे मतदार जास्त असल्याने लोहगावमधून इच्छुकांची संख्याही अधिक आहे.

एससी प्रवर्गातील लोकसंख्या कमी झाल्याने, तसेच गांधीनगरचा भाग तुटल्याने विद्यमान आणि माजी नगरसेवकांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

या प्रभागातून एकूण 819 हरकती आल्या होत्या. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.

वाघोली-खराडी प्रभाग क्र.4

प्रभाग क्रमांक 15 मध्ये असलेला खराडी येथील थिटे वस्तीचा भाग या प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.

या प्रभागाची लोकसंख्या पूर्वी 92383 इतकी होती. आता ती 97187 इतकी झाली आहे.

वडगाव शेरी-कल्याणीनगर प्रभाग क्र.5

या प्रभागाला गणेशनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्डचा काही भाग जोडण्यात आला आहे.

गणेशनगर हा भाग पुन्हा या प्रभागाला जोडण्यात आला आहे. तसेच भाजपला मानणारा महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, त्रिदलनगरचा भागही या प्रभागाला जोडण्यात आला आहे. याचा फायदा भाजपला होणार असल्याची नागरिकांत चर्चा आहे.

भाजपला पडणारे मतदान पाहून या प्रभागाची रचना केली असल्याने इतर पक्षांतून भाजपात ‌‘इन कमिंग‌’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रभागाबाबत 96 हरकती आल्या होत्या. त्यापैकी एकही हरकतीचा विचार झाला नसल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी नगर मॉडेल कॉलोनी प्र. क्र.12

छत्रपती शिवाजी नगर मॉडेल कॉलोनी (प्रभाग क्रमांक 12) यात अंतिम प्रभागरचनेत कोणताही बदल झालेला नाही.

या मतदार संघाची लोकसंख्या ही 77,669 एवढी असून 9,489 एसी तर 869 ही एसटी लोकसंख्या आहे.

येथील आमदार भाजपचे असल्याने या प्रभागावर भाजपचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आरक्षण कसे पडेल यावर देखील उमेदवारी ठरण्याची शक्यता आहे.

कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा प्रभाग क्र.14

या पूर्वी या प्रभागाचे नाव ‌‘कोरेगाव पार्क-मुंढवा‌’ असे होते. नागरिकांनी हरकती घेतल्यावर या प्रभागाचे नाव आता ‌‘कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा‌’ असे करण्यात आले आहे.

हडपसर औद्योगिक वसाहतीशेजारी असलेल्या शिंदे वस्तीचा नवीन कालव्याच्या शेजारी असलेला काही भाग या प्रभागात समाविष्ठ करण्यात आला आहे.

जुन्या प्रभागाची लोकसंख्या 91160 एवढी होती. आता लोकसंख्या 92092 इतकी झाली आहे.

घोरपडी येथील जुन्या कालव्याच्या परिसरातील तीन-चार सोसायट्या या प्रभागात घ्यावात, अशी नागरिकांची मागणी होती. मात्र, या सोसायट्या वानवडी-साळूंखे विहार प्रभागात (क्र. 18) ठेवण्यात आल्या.

मांजरी-केशवनगर-साडेसतरानळी प्रभाग क्र.15

हा प्रभाग नव्याने तयार करण्यात आला असून, परिसरातील लोकसंख्या 88566 इतकी आहे.

या प्रभागात मुंढव्याचा पंधरा टक्के भाग समाविष्ट करण्यात आला आहे.

केशवनगर, मांजरी, साडेसरानळी, शेवाळवाडी या नव्याने समाविष्ट केलेल्या भागाचा या प्रभागात समावेश आहे.

हडपसर-सातववाडी प्रभाग क्र.16

या प्रभागात आता प्रभाग क्रमांक 22 चा काही भाग समाविष्ट केला आहे.

पूर्वी प्रभागातील मतदारांची संख्या 82 हजार इतकी होती. आता ती 92 हजार 232 इतकी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची ताकद समतोल असून, हा प्रभाग दोन्ही पक्षांना अनुकूल ठरण्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी प्रभाग क्र.17

पूर्वी या प्रभागाचे नाव रामटेकडी-माळवाडी असे होते. आता ते रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी असे करण्यात आले आहे.

या प्रभागाची लोकसंख्या 92842 इतकी आहे.

वानवडी-साळुंखे विहार प्रभाग क्र.18पूर्वीच्या प्रभागापेक्षा मोठा बदल या प्रभागात करण्यात आला आहे. कोणत्याही नैसर्गिक खाणाखूणा न पकडता गल्ली बोळातून या प्रभागाच्या सीमारेषा गेल्याचे दिसून येत आहे.

या प्रभागातील मतदरांची संख्या 84763 इतकी आहे.

कौसरबाग-कोंढवा खुर्द प्रभाग क्र.19

या प्रभागात 60 टक्के मुस्लिम, तर 40 टक्के हिंदू मतदार आहेत.

जुना कौसरबाग-महंमदवाडी प्रभाग (क्र. 26) जवळपास तीन ठिकाणी तोडला गेला असून, त्यातील 30 टक्के भाग कोंढव्याला (प्रभाग क्र. 27) जोडण्यात आला आहे.

शंकर महाराज मठ-बिबवेवाडी प्रभाग क्र.20

या प्रभागातून मार्केटयार्डचा काही परिसर, महर्षीनगरचा काही भाग, तसेच गुलटेकडीचा भाग वगळण्यात आला आहे.

जुन्या प्रभागातील आंबेडकरनगर, हमालनगर, स्नेहलनगर, अण्णा भाऊ साठे सभागृह, के. के. मार्केट, इंदिरानगर, सूर्यप्रभा गार्डन, कुमार सिद्धचल, गंगाधाम भाग एक, दोन, वर्धमान पुरा इत्यादी भाग या प्रभागाला जोडला आहे.

मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क प्रभाग क्र.21

या प्रभागातून स्वारगेट कॉर्नर, महर्षीनगर, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क, मार्केट यार्ड, ठाकरे वसाहत, प्रेमनगर वसाहत, आंबेडकरनगर वसाहत हा भाग वगळण्यात आला आहे.

सीमा रेषेबाबत काही प्रमाणात हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. पण त्यांची दखल घेण्यात आली नाही.

या प्रभागात या पूर्वी मतदारांची संख्या 67 हजार होती. आता ती 80 हजार 82 इतकी झाली आहे.

वाढलेल्या मतदार संख्येचा फायदा उमेदवारनिहाय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवार पेठ-नाना पेठ

प्रभाग क्र. रविवार पेठ-नाना पेठ प्रभाग क्रमांक 23

अंतिम प्रभागरचनेत फारसा बदल झालेला नाही.

या प्रभागाची लोकसंख्या ही 76,984 एवढी आहे, तर 9,513 एसी व 327 एसटी लोकसंख्या आहे.

या प्रभागात देखील भाजपची ताकद मोठी असून विद्यमांनाना संधी मिळणार की नव्या इच्छुकांना संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल- के.ई.एम हॉस्पिटल प्रभाग क्र. 24

पूर्वीचा कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठ असे नाव असलेल्या या प्रभागाचे नाव बदलून आता कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-के.ई.एम हॉस्पिटल असे केले आहे.

या प्रभागात काही बदल करण्यात आले आहेत. या प्रभागाची लोकसंख्या ही 76,233 असून यात एससी 8043 तर एसटी 639 एवढी लोकसंख्या आहे.

या प्रभागाची रचना भाजपच्या अनुकूल करण्यात आली, असा आरोप करण्यात आला होता. येथील नागरिकांच्या तक्रारी ऐकून निवडणूक आयोगाने यात काही बदल केले आहेत.

घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी प्रभाग क्र. 26

प्रभाग क्रमांक 26 गुरुवार पेठ-घोरपडे पेठ या प्रभागाचे हे जुने नाव बदलून त्याचे घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी असे नामकरण केले आहे.

या प्रभागाची लोकसंख्या 76,264 एवढी असून यात 9,149 एसी तर 440 एसटी लोकसंख्या आहे.

या प्रभागातून अनेकांनी हरकती नोंदवल्या होत्या. यातील काहींची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

हॅप्पी कॉलोनी- डेक्कन जिमखाना प्रभाग क्र.29

हॅप्पी कॉलोनी-डेक्कन जिमखाना प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 76,194 एवढी आहे.

यात 3601 ही एससीची लोकसंख्या आहे, तर 473 ही एसटीची लोकसंख्या आहे.

या प्रभागात भाजप प्रबळ आहे. गेल्या निवडणुकीतील विद्यमांनाना भाजप संधी देण्याची शक्यता आहे.

हा प्रभाग भाजपच्या दृष्टीने अनुकूल असून, विरोधक येथे काय रणनीती अवलंबवणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

अंतिम प्रभागरचनेत या प्रभागात फारसे बदल झालेले नाहीत.

मयूर कॉलनी-कोथरूड प्रभाग क्र. 31

प्रभाग क्रमांक 31 मयूर कॉलनी-कोथरूड हा भाजपचा गड आहे. या मतदार संघाची लोकसंख्या ही 83,098 एवढी आहे. 5,337 एसी तर 662 ही एसटीची लोकसंख्या आहे. या प्रभागातून भाजप विद्यमान नगरसेवकांना संधी देणार की नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रभागात अंतिम प्रभागरचनेत फारसे बदल करण्यात आलेले नाहीत.

नऱ्हे-वडगाव बुद्रुक प्रभाग क्र. 34

या प्रभागातून आंबेगाव बुद्रुकचा शिवसृष्टी, दबाडी, तसेच जांभुळवाडी, कोळेवाडी हा भाग वगळण्यात आला आहे.

या प्रभागात मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्यात आल्या होत्या.

जुनी मतदार संख्या 92 हजार होती.

नव्या रचनेनुसार प्रभागाची मतदार संख्या 83 हजार झाली आहे.

घटलेल्या मतदार संख्येचा कोणाला फायदा होणार? याबाबत सध्या प्रभागात चर्चा सुरू

बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव प्रभाग क्र.38

पूर्वी या प्रभागाचे नाव आंबेगाव-कात्रज असे होते. ते आता बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव असे करण्यात आले आहे.

या प्रभागाची लोकसंख्या 124981 इतकी झाली आहे.

या प्रभागातील राजस सोसायटी, सुखसागरनगर हा भाग आता प्रभाग 39 मध्ये समाविष्ठ करण्यात आला आहे.

प्रभाग 39 मधील बालाजीनगरचा भागाचा आता या प्रभागात समावेश करण्यात आला आहे.

प्रभाग 34 मधील आंबेगाव पठार सर्वे नंबर 15/16, दभाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी हा भाग या प्रभागात समाविष्ठ केला आहे.

नव्याने समाविष्ठ झालेल्या आंबेगाव बुद्रुक आणि खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी व भिलारेवाडी या गावांचा या प्रभागात समावेश आहे.

अप्पर सुपर-इंदिरानगर प्रभाग क्र. 39

या प्रभागातून महेश सोसायटी 276 अप्पर ओटा, जागडे चाळ, चिंतामणीनगर भाग एक, दोन, तीन, रासकर पॅलेसचा परिसर, प्रसन्न सोसायटी, उमाशंकर सोसायटी, पोकळे वस्ती दामोदर सोसायटी, बिबवेवाडी स्मशानभूमी परिसर इत्यादी भाग वगळण्यात आला आहे.

या प्रभागात पूर्वी मतदारांची संख्या 36 हजार होती. आता ती 78 हजार इतकी झाली आहे.

महंमदवाडी-उंड्री प्रभाग क्र. 41

जुन्या प्रभाग क्रमांक 26 मधील भाग घेवून हा प्रभाग तयार करण्यात आला आहे.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, अवताडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी या गावांचा या प्रभागात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT