वेल्हे : घाटमाथ्यासह चारही धरण क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. खडकवासला धरण साखळीत 99.94 टक्के म्हणजे जवळपास 100 टक्के भरून वाहत असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत 848 क्सुसेक विसर्ग सुरूच आहे.(Latest Pune News)
शनिवारी (दि. 5) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. सकाळपासून कडकडीत ऊन पडले होते. पावसाचे ढग दाटून येऊन पुन्हा विरळ होत आहेत. गुरुवार (दि. 2) पासून तुरळक अपवाद वगळता चारही धरण क्षेत्रात उघडीप आहे; मात्र बुधवार (दि. 1) पर्यंत पडलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील नद्या, ओढे-नाल्यांचे मंद प्रवाह सुरू आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात पाण्याची आवक धरण साखळीत सुरूच आहे.
खडकवासला धरण साखळी एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी
आज दिवसअखेर साठा 29.13 टीएमसी -99.94 टक्के
पावसाने विश्रांती घेतली असली तरी अद्याप ओढे-नाल्यांतून पाण्याची मंदगतीने आवक सुरू आहे. त्यामुळे खडकवासलातून जादा पाणी मुठा नदीत सोडुनही पाण्याची तूट भरून खडकवासला धरण जवळपास 100 टक्के भरले आहे. सध्या पानशेतमधून 600 क्सुसेक पाणी सोडले जात आहे.
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग