राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी झाली असून त्याची जोरदार चर्चा आहे. शरद रणपिसे यांच्या रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली असून ही जागा बिनविरोध व्हावी यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हीच निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने १५ नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली होती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झालं. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली. विरोधी पक्षाशी चर्चा करून प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले होते. त्याचाच एक भाग म्हणून ही भेट होत आहे. याआधी राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर फडणवीस यांची भेट घेऊन ही जागा बिनविरोध केली होती.
विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे.
६ जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या ६ जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूर या जागांचा समावेश आहे.
हेही वाचा :