Deepveer Wedding Anniversary : लग्नाचा तिसरा वाढदिवस, खास ठिकाणी सेलिब्रेशन | पुढारी

Deepveer Wedding Anniversary : लग्नाचा तिसरा वाढदिवस, खास ठिकाणी सेलिब्रेशन

पुढारी ऑनलाईन :

Deepveer Wedding Anniversary – बॉलिवूडची लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमध्ये लग्न केलं होत. त्यांनी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस एका हिल स्टेशनवर साजरा केलाय. या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटो पाहून त्यांना फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.(Deepveer Wedding Anniversary)

या क्यूट कपलचे इटलीमध्ये ग्रॅण्ड वेडिंग झाले होते. रॉयल लग्न पाहून अनेकांच्या भूवयाही उंचावल्या होत्या. आजही त्यांच्या लग्नाची चर्चा होत राहते. आता हे दोघे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला उत्तराखंडला गेले.

दीपिका आणि रणवीरने नुकताच आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. दीपिकाने उत्तराखंडमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

आधीपासून होतं दीपवीरचं अफेअर, सर्वांपासून लपवून ठेवलेलं

दीपवीर प्रेमात पडले ते एका चित्रपटावेळी. त्या चित्रपटाते नाव आहे ‘रामलीला’. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले होते. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये दीप-वीरने लग्नगाठ बांधली.

दीपिकाने रणवीरसोबत मैत्री करण्यापूर्वी एक अट घातली होती. कारण, दीपिकाला प्रेमात अनेकदा धोके मिळाले होते. त्यामुळे तिला रिलेशनशिपमध्ये यायचं नव्हतं. रणवीर आणि दीपिकाने चित्रपट ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ केला. या चित्रटावेळीचं दोघे जवळ आले आणि त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली.

इटलीमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबर, २०१८ रोजी दीपिका आणि रणवीर सिंह विवाहबंधनात अडकले. दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. परंतु, दोघांनी उघडपणे आपले नाते कबुल केले नव्हते. पण, दीपिकाचे आई- वडील मुंबईमध्ये रणवीरच्या घरी आल्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि दोघांची लव्हस्टोरी सर्वांसमोर आली.

लीला राम-लीला’मध्ये काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मध्यंतरी, दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. रणवीर सिंह दीपिकाने परिधान केलेल्या घागरा चोळीकडे एकटक पाहत असल्याचा हा फोटो होता. अभिनेते गुलशन देवैया यांनी या चित्रपटात दीपिकाच्या चुलत भावाची भूमिका साकारली होती. रणवीर-दीपिकाची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? हे त्यांनी सांगितले होते.

गुलशन देवैया यांनी सांगितले होते की, ‘गोलियों की रासलीला राम-लीलाच्या की शूटिंगवेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. पहिल्या दिवसांपासून त्यांच्यामध्ये चांगली बॉन्डींग झाली होती. यानंतर दीपिकाने रणवीरसोबत बाजीराव मस्तानी चित्रपट केला.’पद्मावत’ चित्रपटावेळीही दोघेही एकत्र होते. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह खलनायकाच्या भूमिकेत होता.

फिल्मफेअरच्या एका मुलाखतीत दीपिका पादुकोणने सांगितलं की, जेव्हा ती रणवीरला भेटली होती, तेव्हा तिला कुणावरचं विश्वास नव्हता. त्यावेळी दीपिकाला रणवीर सिंह आवडत होता. पण, ती रिलेशनशिपमध्ये राहू शकत नव्हती. कारण, मागील रिलेशनशीपमध्ये तिचा विश्वास तुटला होता. दीपिकाने सांगितलं होतं की, रणवीर सिंहला भेटल्‍यानंतर सांगितले होते की, रिलेशनशिपऐवजी तिल कॅज्युअल डेटिंग करायचं आहे.

फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर सिंहने सांगितलं की, तेव्हा आयुष्यात असं जवळ कुणीचं नव्हतं. कुणाशीच रिलेशनशिपमध्ये नव्हते. मुलाखतीत, त्याने म्हटलं होतं की, आयुष्यात तुम्हाला असे अनेकदा वाटते की, आपल्याला साथ देणारा व्यक्ती नेहमी आपल्यासोबत असायला हवा. रणवीरचं म्हणणं होतं की, आता त्याला फॅमिली मॅन व्हायचं होते, आणि त्याला मुले आवडायची.

आगामी चित्रपटामध्ये बिझी

सध्या दोघंही त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये बिझी आहेत. दीपिका रणवीरसोबत ’83’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर दीपिका ‘पठाण’ आणि ‘फाइटर’, ‘द इंटर्न’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. रणवीर ‘सर्कस’, ‘तख्त’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

Back to top button