प्रफुल्ल पटेल म्हणाले अनिल देशमुख यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचंय! | पुढारी

प्रफुल्ल पटेल म्हणाले अनिल देशमुख यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचंय!

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. नागपुरातल्या लकडगंज परिसरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवारांच्या आशिर्वादानं अनिल देशमुख लवकरच जेलमधून बाहेर येतील, असा विश्वासही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. हे आपलं मत नसून शरद पवार यांचं मत असल्याचं स्पष्टीकरणही प्रफुल्ल पटेलांनी दिलं आहे.

प्रफुल्ल पटेल यावेळी बोलताना म्हणाले की, “हे अनिल भाऊ लवकरच आपल्या सोबत येतील. पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे. पवार साहेबांचा पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आणि आपल्याला लवकरात लवकर अनिल बापूला परत या त्यांच्या जागेवर बसवायचं आहे. हे पवार साहेबांचे विचार आहेत. माझ्या एकट्याचे नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोणतीही पोकळी निर्माण झालीये, असं कोणाला वाटू नये.

अनिल देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “एक दिवस माझ्याकडे मुंबईचे पोलीस आयुक्त आले आणि त्यांनी मला सांगितले की, अनिल देशमुख यांच्याबद्दल माझी तक्रार आहे आणि ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरही घातली आहे. आता मी तुम्हाला सांगायला आलो आहे. त्यावर मी परमबीरांनी विचारलं की तुमची काय तक्रार आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितले आम्हाला देशमुखांनी अशा सूचना दिल्या आहेत.

“शरद पवार पुढे म्हणाले की, “मी त्यांना म्हटले अनिल देशमुख यांनी अशा सूचना देणे शक्यच नाही. आणि तशा सूचना दिल्या असतील तर तुम्ही त्या सूचनांची अंमलबजावणी केली का? त्यावर परमबीरांनी सांगितले की त्याची आपण अंमलबजावणी केली नाही. जर पोलीस आयुक्तांनी त्या सूचनांची अंमलबजावणी केली नाही तर अनिल देशमुखांचा दोष काय हे मला समजत नाही. तुम्ही (परमबीर सिंग) इथे कोणाबद्दल अपप्रचार करत आहात असे मी त्यांना सांगितले”.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मुंबईत मराठी आवाज बाळासाहेबांनी बुलंद केला | बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विशेष |balasaheb Thackeray

Back to top button