कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, निवेदिता माने, विजय देवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांची बैठक झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी, आम्ही सदैव पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, २७० मते घेऊन बंटी पाटील नक्की विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

खासदार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीची संकल्पना कोल्हापुरातून सुरू केल्याचे सांगत एकदिलाने सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राजू शेट्टी म्हणाले की, आम्हीही पाठिंबा दिलेला आहे, निश्चितच ते विजयी होतील. पूरग्रस्त तुमच्यावर नाराज आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. हीच वेळ आहे सांगण्याची आणि तुम्ही ऐकून घायची. साथ नक्की देऊ, पण आमच्या अपेक्षा आहेत त्या विसरू नका.

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : ‘शिवसेनेचं एकही मत इकडे तिकडे जाणार नाही’

राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी,  गेल्या वर्षी पेक्षा चांगलं मताधिक्य मिळेल, हा विश्वास आहे. एक मतदान वाया जाणार नाही, असा दावा केला. उदय सामंत म्हणाले की, आमचं एकही मत इकडे तिकडे जाणार नाही, हा विश्वास शिवसेनेकडून देतो. महाविकास आघाडीच सरकार आणायचं आहे आणि पालकमंत्री यांनी केलेला विकास सर्वत्र पोहोचवायचा आहे. बंटी साहेब हुशार आहेत, त्यानी १ वर्ष आधीच प्रचार सुरू केलाय. त्यामुळं अनेक लोक त्यांच्या गळाला लागलेली आहेत. ही जागा आपण नक्की जिंकू.

हे ही वाचा :

Back to top button