मुंबई : पवईच्या साकी विहार रोडवर ह्युदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग; कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक | पुढारी

मुंबई : पवईच्या साकी विहार रोडवर ह्युदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग; कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक

पवई; पुढारी वृत्‍तसेवा

पवईच्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टुबरो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला आज (गुरूवार) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली. यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इमारत खाली करण्यात आली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहचले आहेत. या आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदतकार्याला उशीर होत आहे. शोरूममधून मोठं मोठ्या स्फोटाचे आवाज येत आहेत.

तर या शोरूममध्ये कोट्यवधी रूपयांच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला या ठिकाणी एक प्रचंड स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शी देत असून, स्थानिकांच्या महितीनुसार काही लोक आगीत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पहा व्हिडिओ :  मुंबईत मराठी आवाज बाळासाहेबांनी बुलंद केला | बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विशेष 

 

 

Back to top button