

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविकांत तुपकर यांनी नागपुरातील संविधान चौकात काल बुधवारी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं होते. रात्री पोलिसांनी आंदोलन ठिकाणापासून तुपकर यांना ताब्यात घेतलं आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांनी काल बुधवारपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला होता. नागपूर पोलिसांनी त्यांना रात्रीचं ताब्यात घेतलं आहे.
रविकांत तुपकर यांनी पोलिस ठाण्यातही अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवलं आहे. तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे स्वाभिमानी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
रविकांत तुपकर यांनी यावेळी पोलिसांना सवाल उपस्थित केला आहे. नागपुरात संचारबंदीमुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. मग कर्फ्यू आदेश लागू असूनही खासदार शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली असा सवाल तुपकरांनी उपस्थित केला आहे.