Latest

लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईत प्रवाशांचे हाल

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई शहर आणि उपनगरात जाेरदार पावसामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्‍याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे खूपच हाल झाले.

अधिक वाचा 

मुंबई येथील मध्य रेल्वेची सीएसएमटी ते कल्याण दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली. सायन, कुर्ला, विद्याविहार, कांजूरमार्ग आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी भरल्याने लोकल जागीच थांबल्या.

लोकलची वाहतूक थांबल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे खूपच हाल झाले. काही प्रवासांनी लोकलमधून खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरून चालत जवळचे स्टेशन गाठले.

अधिक वाचा 

लोकलची वाहतूक संथगतीने सुरु

शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लोकल संथगतीने सुरु झाली.
रेल्वेचे बंचिंग झाल्याने मेंन लाईनची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरु झाली.

अधिक वाचा 

हार्बर मार्गावरील वाहतूक देखील १० मिनिटे विलंबाने धावत आहे. ट्रान्सहार्बर, नेरुळ- खारकोपर तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे.

१०० मिमी पावसाची नोंद

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात पहाटे ४ ते ७ या वेळेत ३६ मिमी, पूर्व उपनगरात ७५ मिमी आणि पश्चिम उपनगरात ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्‍हिडीओ : आता परदेशी फळं मिळणार मुंबईच्या टेरेसवर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT