कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित दौरा रद्द रेड अलर्ट मुळे रद्द करण्यात आला आहे. पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिल्याने हा दौरा रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात अतिमुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना प्रचंड महापूर आला होता. कोल्हापूर शहरात पाणी घुसले होते. जिल्ह्यातील नदीकाठची गावे पाण्यात गेली होती.
सध्या पूर ओसरत असून राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे होत आहेत.
नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा दौरा केला.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (ता २९) आणि उद्या (ता. ३०) दोन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येणार होते.
मात्र, हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आजपर्यंत पाऊस लागल्याने शासकीय दौरा रद्द करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही कोल्हापूर दौरा नियोजित होता. त्यानुसार त्यांचा दौरा होणार आहे.
आज (ता. २८) फडणवीस सांगली येथून आपला दौरा सुरू करणार आहेत.
त्यानंतर ते कोल्हापूर येथे येऊन शहरातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. शुक्रवारी ते आंबेवाडी आणि चिखली येथे जाणार आहेत.
हेही वाचा :
पहा व्हिडिओ: पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा