Latest

भारतीय वंशाचा जस्‍टिन नारायण ठरला ‘मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलिया’

नंदू लटके

सिडनी ; पुढारी ऑनलाईन : भारतीय वंशाचा जस्‍टिन नारायण याने मानाची मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलिया सीजनचा विजेता ठरला आहे. तब्‍बल१.८ कोटी रुपयांच्‍या (२.५ लाख डॉलर) बक्षीसावर आपली मोहर उमटवली. ही ट्रॉफी जिंकणारा जस्‍टीन नारायण हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी शशी चेलियाने या शोमध्‍ये बाजी मारली होती.

अधिक वाचा 

मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलिया ही जगातील सर्वात मोठी पाककला (कुकिंग) स्‍पर्धा आहे. सलग १३ वर्ष या स्‍पर्धेने आपले मानाचे स्‍थान कायम ठेवले आहे.

मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलिया ट्रॉफीसह जस्‍टीन नारायण

या स्‍पर्धेत केवळ हॉटेलमधील पाककलेलाच प्राधान्‍य दिले जाते. मुळचा भारतीय वंशाचा असणारा २७ वर्षीय जस्‍टीन नारायण हा पश्‍चिम ऑस्‍ट्रेलियाचा नागरिक आहे.

मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलिया शोमध्‍ये त्‍याने भारतीय खाद्‍यपदार्थ सादरीकरण केले. यामध्‍ये लोणचे कोशिंबीर, प्‍लॅटब्रेड, चिकन करी, इंडियन चिकन टाकोज, चारकोल चिकन विथ टॉम आणि फ्‍लॅटब्रेड या व्‍यंजनांचा समावेश हाेता. हे सर्व खाद्‍यपदार्थ परीक्षकांच्‍या पसंतीला उतरले.

अधिक वाचा 

 ऐनवेळी निर्णय घेण्‍याची क्षमता

शेफ जस्‍टीन नारायण याने सादर केलेल्‍या पदार्थांबरोबरच ऐनवेळी योग्‍य निर्णय घेण्‍याची त्‍याची क्षमता शोच्‍या परीक्षकांना भावली.

मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलिया ही स्‍पर्धा जिंकण आव्‍हानात्‍मक होते. या स्‍पर्धेत जस्‍टिन याने खुप चढ-उतार पाहिले.जस्‍टीन याची स्‍पर्धा ऑस्‍ट्रेलियातील न्‍यू साउथ वेल्‍स प्रांतातील पीट कॅपबेल आणि मुळच्‍या बांगलादेशच्‍या किश्‍वर चौधरी बरोबर होती.या दोघांनी अनुकझमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला.

अधिक वाचा 

आई हिच सर्वात मोठी प्रेरणा

वयाच्‍या १३ वर्षी त्‍याने स्‍वयंपाक शिकण्‍यास सुरुवात केली. आई हिच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. ती सर्वात रुचकर आणि स्‍वादिष्‍ट स्‍वयपाक करते, असे जस्‍टीन सांगतो.

मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलियाच्‍या अधिकृत इंस्‍टाग्राम पेजवर जस्‍टीन याचा ट्रॉफीसह फोटो शेअर केले आहेत. जगातील सर्वात प्रसिद्‍ध कुकिंग स्‍पर्धेत आता भारतीय पदार्थांना पसंती मिळत आहे.

मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलिया सीझनमध्‍ये पाककला सादर करताना जस्‍टिन नारायण

जस्‍टीन भारतीय पदार्थांचा चाहता

वेगवेगळे खाद्‍पदार्थ करणे हा जस्‍टीन याचा छंदच होता. नेमके यामुळेच परीक्षकांची पहिली पसंती ताे ठरला.

जस्‍टनी २०१७मध्‍ये भारतात आला होता. यावेळी भारतीय संस्‍कृती, इतिहास आणि खाद्‍य पदार्थांचा तो चाहताच झाला होता.

तो जगातील सर्व प्रकारचे खाद्‍यपदार्थ बनवतो. पण, भारतीय खाद्‍यपदार्थ बनविण्‍यात त्‍याला अधिक रस आहे.मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलिया या टीव्‍ही शोने माझे आयुष्‍य बदलले आहे. संपूर्ण स्‍पर्धेतील अनुभव हा अविस्‍मरणीय ठरला. आता या शोमधील परीक्षक आणि स्‍पर्धकांबरोबर पार्टी करण्‍याचा माझी इचछा आहे, अशी अपेक्षा जस्‍टीनने व्‍यक्‍त केली आहे.

गरीब मुलांना मदत करण्‍याचे स्‍वप्‍न…

भारतीय वंशाचा जस्‍टिन नारायण हा मास्‍टरशेफ ऑस्‍ट्रेलियाच्‍या अंतिम स्‍पर्धेत गेल्‍याने सोशल मीडियावर याची चर्चा होती.जस्‍टिनला स्‍वत:च रेस्‍टॉरंट सुरु करण्‍याचे त्‍याचे स्‍वप्‍न आहे.

यामध्‍ये भारतीय पदार्थ असतील. या कमाईतून भारतातील गरीब मुलांसाठी खाण्‍याची आणि शिक्षणाचाी सोय करण्‍याचेही त्‍याचा मानस आहे.

पाहा फाेटाे:  [visual_portfolio id="6394"]

हेही वाचल का ?

पहा व्‍हिडिओ : म्‍हातारपाखाडी :  २०० वर्षे जुन्‍या घरांचं मुंबइईतलं गाव  

SCROLL FOR NEXT