अहमदाबाद (गुजरात); पुढारी ऑनलाईन : द्वारका येथे भगवान श्रीकृष्ण यांचे मंदिर (Shree Dwarkadhish Temple) आहे. द्वारका येथे मंगळवारी जोरदार पाऊस पडला. अशात द्वारका जिल्ह्यातील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर (Shree Dwarkadhish Temple) वीज कोसळली. यामुळे मंदिरावरील (Shree Dwarkadhish Temple) ध्वजाचे नुकसान झाले.
मात्र, मंदिर भवनाचे कोणतेही नुकसान झाले नाही. या घटनेमुळे कसलीही जीवितहानी झाली नाही.
अधिक वाचा :
पण हा चमत्कार तर नाही ना, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. वीज कोसळण्याच्या घटनेनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
मंदिरावर वीज कोसळत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळली त्यावेळी मोठा आवाज झाल्याचे सांगितले जात आहे.
अधिक वाचा :
वीज कोसळल्यामुळे मंदिराची भिंत काळी पडली आहे. तर मंदिराच्या ५२ फूट ध्वजाचे नुकसान झाले आहे.
मंदिरावरील या वीज कोसळण्याच्या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर बहुतांश लोकांनी दावा केला आहे की देवाने मोठे संकट आपल्या डोक्यावर घेतले आणि आम्हा भक्तांची सुरक्षा केली.
अधिक वाचा :
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वीज कोसळण्याच्या घटनेनंतर द्वारका जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली.
गांधीनगर येथील अमित शहा यांच्या कार्यालयातून जारी केलेल्या माहितीनुसार, वीज कोसळल्यामुळे मंदिराचे कसल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
हे ही वाचा :