Latest

IAF : भारतीय हवाई दलाच्या दोन चाचण्या यशस्वी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था व भारतीय हवाई दलाने (IAF) स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या स्मार्ट अँटी-एअरफिल्ड अस्‍त्राच्‍या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील पहिली चाचणी २८ ऑक्टोबरला आणि दुसरी चाचणी ३ नोव्हेंबर राेजी घेण्यात आली. या दोन्हीही चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.

संरक्षण क्षेत्रात (IAF) विमानांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे शत्रू शोधणे सोपे जाणार आहे.  तसेच या अस्‍त्राच्‍या माध्‍यमातून शत्रूवर अचूक आघात करता येणार आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे.

सॅटेलाईट नेव्हिगेशन आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सरवर आधारित दोन चाचण्या करण्यात आल्या आहेत. लाँग रेंज बॉम्बची चाचणी पहिल्यांदाच इलेक्ट्रो ऑप्टिकल सीकर तंत्रज्ञानासोबत करण्यात आली. इलेक्ट्रो ऑप्टिक सेन्सर स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आले आहेत.

राजस्थानच्या जसलमेरमध्ये असलेल्या पोखरणमध्ये चाचण्या घेण्यात आल्या. यंत्रणा इलेक्ट्रो-ऑप्टिकल कॉन्फिगरेशन इमेजिंग इंफ्रारेड (आयआयआर) सीकर तंत्रज्ञानानं सज्ज आहे. यामुळे हल्ला अधिक अचूक होतो. दोन्ही चाचण्यांमध्ये अपेक्षित परिणाम पाहायला मिळाले. या चाचण्यांमध्ये डमी शत्रूला हत्यारानं पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात यश मिळालं. या यंत्रणेच्या माध्यमातून १०० किलोमीटर अंतरापर्यंत असलेले शत्रूचे अड्डे उद्ध्वस्त केले जाऊ शकतात, असंही चाचणीत स्‍पष्‍ट झाल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का ?

पहा व्हिडीओ  : बघता बघता सुंदर रांगोळी काढणाऱ्या कलाकाराची ग्रेट भेट

हे वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT