Latest

इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू , इमारतीच्या २४ खोल्या केल्या रिकाम्या

नंदू लटके

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: ठाण्यातील राबोडित इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू. आज पहाटे ही दुर्घटना घडली. तिसर्‍या मजल्‍यावरील  स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू. रमिज शेख(३२) आणि गॉस तांबोळी (३८) अशी त्‍यांची नावे आहेत.

अरमान तांबोळी ही व्यक्ती जिवंत असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या सी विंग मधील २४ खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

ठाण्यात गेल्या दोन तीन दिवसंपासून पावसाची रिपरिप सुरूच आहेत.

ठाण्यात या दोन दिवसात पडझडीच्या घटनाही घडलेल्या आहेत.

रोबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही २५ वर्ष जुनी इमारत आहे.

आज पहाटे ६ च्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या अश्फाक वागनी यांचा पूर्ण स्लॅब हा तळ मजल्यावर कोसळला. तळ मजल्यावरील रहिवासी दबले गेले.

या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, फायर ब्रिगेड हे घटनास्थळी दाखल झाले.

तीन लोकं या स्लॅबखाली दबले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित रेस्क्यू ऑपरेशन करून या तिघांना बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले.

यापैकी एकाला संजीवनी हॉस्पिटल तर दोघांना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र उपचारा दरम्यान यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

खत्री अपार्टमेंट ही जुनी इमारत असून धोकादायक झालेल्या सी विंग मधील २४ खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

या सर्व कुटुंबातील लोकांचे जवळच्या खांदेशी मस्जिदमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

शहरातील अनेक इमारती या जीर्ण झाल्या असल्याने अशा इमारातींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचलं का ? 

व्‍हिडिओ

SCROLL FOR NEXT