Latest

केज-अंबाजोगाई रोडवरील पूल खचला; वाहतूक बंद

अनुराधा कोरवी

केज; पुढारी वृत्तसेवा: जोरदार अतिवृष्टीने केज-अंबाजोगाई रोडवरील डॉ. थोरात यांच्या दवाखान्या जवळील तात्पुरत्या स्वरूपात बांधलेला कच्चा पूल खचला आहे. यामुळे केज- अंबाजोगाई वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

यामुळे अंबाजोगाईकडे जाणाऱ्या वाहनांनी कळंब चौकातून साळेगाव-माळेगाव-युसुफ वडगाव या मार्गे अंबाजोगाईकडे जावे.

तसेच अंबाजोगाईकडून केज, बीड, औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांनी लोखंडी सावरगाव- बोरीसावरगाव- युसुफवडगाव-माळेगाव-साळेगाव-केज या मार्गाने पुढे जावे, असे आवाहन केज पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे व त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत अंबाजोगाई परिसरात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे काही पुल खचले आहेत.

केज- अंबाजोगाई वाहतूक बंद

केज जवळील डॉ. थोरात यांच्या दवाखान्याजवळील पिसेगावहून येणाऱ्या नदीवरील तात्पुरता उभारलेला पूल वाहून गेला असल्याने केज ते अंबाजोगाई वाहतूक बंद आहे.

च रात्री युसुफवडगाव येथील पुलावरून जोरदार पाणी वाहत होते. तसेच सावळेश्वर पैठण येथील पूल खचल्याने कळंब ते अंबाजोगाई ही सुद्धा वाहतूक सेवा बंद झाली आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT