सख्ख्या चुलत भावाने केला अल्पवयीन भावाचा खून | पुढारी

सख्ख्या चुलत भावाने केला अल्पवयीन भावाचा खून

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या रागातून सख्ख्या चुलत भावाने अल्पवयीन भावाची डोक्यात हातोडीने घाव घालून हत्या केली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

याबाबत अनिल भगीरथ परदेशी (वय 52, रा. रविवार पेठ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. दशांत अनिल परदेशी (वय 17, रा. रविवार पेठ, तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कमलेश सुरेश परदेशी (वय 20) आणि प्रकाश संजय लोहार (वय 19, दोघेही रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक केली आहे.

Good News : अमेरिकेच्या H1-B आणि इतर Work व्हिसासाठी १ वर्ष प्रत्यक्ष मुलाखती नाहीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी दशांत हा काही कामानिमित्त बाहेर गेला होता. परंतु, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे घरच्यांनी पोलिसांशी संपर्क केला. रात्री शोध घेत असताना दशांत तळेगाव येथील नॅशनल हेवी कंपनीजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.

व्यावसायिकावरील छाप्यात सापडलं घबाड, नोटा मोजताना अधिकाऱ्यांना फुटला घाम

दशांत व आरोपी कमलेश व प्रकाश हे तिघे मित्र होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्याचा राग डोक्यात धरून आरोपींनी दशांत याला फोटो काढावयाचे आहेत, असे सांगून तळेगाव खिंडीजवळील नॅशनल हेवी कंपनीजवळ नेले आणि फोटो काढत असताना त्याच्या डोक्यात हातोडीने घाव घातले. त्यामध्ये दशांत याचा मृत्यू झाला.

ओमायक्रॉननं चिंता वाढवली! एका दिवसात ‘एवढे’ वाढले रुग्ण

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश, उपायुक्त अनंत भोईटे, काकासाहेब डोळे, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर, संजय नाईक पाटील तसेच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत घटनास्थळी दाखल झाले.

ही घटना पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर घडल्याने पोलिसांना तपासाचे मोठे आव्हान होते. दशांतच्या मोबाइलवर आलेल्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. दशांत हा तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्या मंदिर येथे इयत्ता 11 वी मध्ये कला शाखेत शिकत होता.

 

 

Back to top button