नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशात गुरूवारी दिवसभरात ६ हजार ६५० कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ३७४ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान ७ हजार ५१ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशाचा कोरोनामुक्तीदर त्यामुळे ९८.४० टक्क्यांवर पोहचला आहे. तर, एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४७ लाख ७२ हजार ६२६ पर्यंत झाली. आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख १५ हजार ९७७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर, ७७ हजार ५१६ सक्रिय कोरोनाबाधितांवर (०.२२) उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ४ लाख ७९ हजार १३३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
शुक्रवारी देशाचा कोरोना संसर्गदर ०.५७ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.५९ टक्के नोंदवण्यात आला. गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ७७५ ची घट नोंदवण्यात आली. तर, दिवसभरात ओमायक्रॉन बाधितांची संख्या ११२ ने वाढल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सर्वाधिक ८८ ओमायक्रॉन बाधित महाराष्ट्रात आहेत. दिल्ली ६७, तेलंगणा ३८, तामिळनाडू ३४ तसेच कर्नाटकमध्ये ३१ ओमायक्रॉन बाधित आहेत. देशातील आतापर्यंत एकूण ३५८ ओमायक्रॉन बाधित आढळले असून यातील ११४ रूग्णांनी संसर्गावर मात मिळवली.
लसीकरण अभियानातून आतापर्यत १ अब्ज ४० कोटी ३१ लाख ६३ हजार ६३ डोस लावण्यात आले आहेत. यातील ५७ लाखांहून अधिक डोस गुरूवारी लावण्यात आले. देशातील जवळपाास ६८ टक्के पात्र लोकसंख्येचे संपुर्ण लसीकरण करण्यात आले आहे. तर, ८९ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस लावण्यात आला आहे.
केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १ अब्ज ४७ कोटी ७२ लाख ११ हजार १३५ डोस पुरवण्यात आले आहेत. यातील १७ कोटी ९७ लाख ३४ हजार ३११ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ६६ कोटी ९८ लाख ९ हजार ८१६ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ११ लाख ६५ हजार ८८७ तपासण्या गुरूवारी करण्यात आल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा :