Sukesh Chandrashekhar : अभिनेत्री जॅकलिनबरोबर मैत्रीसाठी सुकेश चंद्रशेखरने अमित शहांच्‍या ऑफिसच्‍या नंबरला केले ‘स्‍पूफ’ | पुढारी

Sukesh Chandrashekhar : अभिनेत्री जॅकलिनबरोबर मैत्रीसाठी सुकेश चंद्रशेखरने अमित शहांच्‍या ऑफिसच्‍या नंबरला केले 'स्‍पूफ'

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) २०० कोटींच्या वसुली प्रकरणातील सूत्रधार सुकेश चंद्रशेखर ( Sukesh Chandrashekhar ) याचा आणखी एक धक्‍कादायक कारनामा समोर आला आहे. त्‍याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबरोबर मैत्री करण्‍यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या ऑफिसचा नंबरलाच ‘स्‍पूफ’ केले होते, अशी माहिती ‘ईडी’ने दोषारोपपत्रात दिली आहे.

२०० काेटी रुपयांच्‍या मनी लॉड्रिंग प्रकरणी विशेष न्‍यायालयात ‘ईडी’ने दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात सुकेश चंद्रशेखर याच्‍यासह त्‍याची पत्‍नी लीना मरिया पोल आणि अन्‍य सहा जणांची नावे आहेत.

Sukesh Chandrashekhar : अमित शहांच्‍या ऑफिस नंबरला केले ‘स्‍पूफ’

‘स्‍पूफ’ म्‍हणजे,  फोनची रिंग वाजल्‍यानंतर फोन करणार्‍यांना खरा नंबर दिसत नाही तर अन्‍य नंबर दिसतो. जॅनलिनबरोबर मैत्री करण्‍यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या ऑफिसचा नंबरलाच सुकेशने ‘स्‍पूफ’ केले होते, असे ईडीने आपल्‍या आरोपपत्रात म्‍हटलं आहे. याप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसचा जबाब दोनवेळा नोंदविण्‍यात आला आहे. चंद्रशेखर ओळख करुन देताना आपलं नाव ‘शेखर रत्‍न वेला’ असे सांगितले होते, असे जॅनलिनने आपल्‍या जबाबात म्‍हटलं होते.

‘ईडी’ने दोषारोपपत्रात म्‍हटलं आहे की, सुकेश याने अभिनेत्री जॅकलिनच्‍या संपर्कात येण्‍यासाठी डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१मध्‍ये प्रयत्‍न केले. मात्र तिने त्‍याला प्रतिसाद दिला नाही. जॅकलिनचा मेकअप आर्टिस्‍ट शान मुथिल याने सुकेश हा केंद्रीय गृह मंत्रालयातील महत्‍वाचा व्‍यक्‍ती असल्‍याचे सांगितले. तसेच त्‍याचा मोबाईल नंबरही जॅकलिनला शेअर केला होता. सुकेशने जॅकलिन फर्नांडिसबरोबर मैत्री करण्‍यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या ऑफिसचा नंबरलाच ‘स्‍पूफ’ केले होते. जॅकलिनशी ओळख करुन देताना ‘सन टीव्‍ही’चा मालक असल्‍याचे सुकेश याने सांगितले होते. तसेच तामिळनाडूच्‍या दिवंगत मुख्‍यमंत्री जयललिता यांच्‍या नातेवाईक असल्‍याचेही त्‍याने म्‍हटलं होतं. मी तुमचा मोठा फॅन आहे. तुम्‍हाला घेवून दाक्षिणात्‍य चित्रपटाची निर्मिती करायची आहे, यानंतर त्‍याने जॅकलिनला महागडे गिफ्‍ट दिले होते, असेही त्‍याने जॅकलिनने आपल्‍या जबाबत म्‍हटलं होतं.

२०० कोटींच्या वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश असल्याने तिला देशाबाहेर जाण्यापासून राेखले होते. . ईडीच्या तपासात सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीनला 10 कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्याचे स्‍पष्‍ट झाले होते. यामध्ये आलिशान गाड्या, घोडे आणि इतर महागड्या वस्तूंचा समावेश आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button