‘७/१२’ ला एक लाख मोफत सात बारा वाटणार | पुढारी

‘७/१२’ ला एक लाख मोफत सात बारा वाटणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकर्‍याना मोफत सुधारित 7/12 वाटप करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 7 डिसेंबरचे (7/12) औचित्य साधून एकाच दिवसात 1 लाख मोफत सातबारा वाटपाची महिम राबविली जाणार आहे.

bullock cart race : बैलगाडी शर्यतीवर आता १५ डिसेंबर रोजी सुनावणी

जिल्ह्यात एकूण खातेदारांची संख्या 12 लाख 34 हजार 471 इतकी असून त्यापैकी 5 डिसेंबरपर्यंत अखेरपर्यंत 10 लाख 10 हजार 278 सातबारा मोफत वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 2 लाख 24 हजार 193 सातबारा वाटप करावायाचे आहेत. यापैकी 7 डिसेंबरचे (7/12) औचित्य साधून एकाच दिवसात 1 लाख सात बारा वाटप करण्याचे नियोजन जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी केले आहे. एकूण 557 सज्जांच्या गावी तलाठ्यांकडून या सात बाराचे वाटप करण्यात येणार आहे.

आज पृथ्वीजवळून जाणार ६ मोठ्या अशनी

जिल्ह्यात 6 डिसेंबरपर्यंत मुदत पूर्ण झालेल्या 11 हजार 789 नोंदी प्रलंबित असून, या नोंदींमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेकडून संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मागील महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीमध्ये 3 हजार 369 इतक्या नोंदी निर्गत झालेल्या आहेत. डिसेंबर महिन्यात दुसर्‍या बुधवारी 8 डिसेंबर 2021 रोजी तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

ही तर माझ्यासाठी तीर्थयात्रा ; रायगड भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आनंदित

उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनादेखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 8 डिसेंबर रोजी होणार्‍या फेरफार अदालतीमध्ये फेरफार नोंदी प्रलंबित असलेल्या व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत आणि आपल्या नोंदी निर्गत करून घ्याव्यात.                                                                                                        – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत परवानगी द्या’

Back to top button