आज पृथ्वीजवळून जाणार ६ मोठ्या अशनी | पुढारी

आज पृथ्वीजवळून जाणार ६ मोठ्या अशनी

अशनी चा वेग ताशी ४४,३८८ किलोमीटर

पुढारी ऑनलाईन डेस्क 

आज पृथ्वीच्या जवळून सहा मोठ्या अशनी जाणार असल्याची माहिती नासाने दिलेली आहे. यातील सर्वांत मोठ्या अशनींचा वेग ताशी 44,388 किलोमीटर असा आहे. पण नासाने यासंदर्भात कोणताही धोक्याचा इशारा दिलेला नाही.

या अशनींची गणना Near Earth Object मध्ये करण्यात आलेली आहे.  2021 VX7, 2021 WE1, 2021 WM2, 2021 XT1, 2021 WL2, 2021 XE असे या अशनींचे नावे आहेत.

नासा गेली काही वर्षं या अशनींच्या कक्षांचा अभ्यास करत आहे. सूर्याच्या दिशेने जात असताना या अशनी पृथ्वीकडे वेगाने येत असल्याचे नासाच्या अभ्यासून दिसून आलेले आहे. अवकाशातील ही एक महत्त्वाची घटना ठरणार आहे.

अशनी किती मोठ्या?

यातील  2021 VX7 हा अशनी सर्वांत मोठा आहे. त्याचा व्यास 31-70  मीटर इतका आहे. त्यानंतर 2021 WM2 या अशनीचा क्रमांक लागतो, तो 18-19 मीटर इतका मोठा आहे. तर  2021 XE हा अशनी 4.7-11 मीटर इतका लहान आहे.

यातील 2021 WM2 या अशनीचा वेग सर्वांत जास्त म्हणजे ताशी 44,388 किलोमीटर इतका आहे.

पृथ्वीपासून 31,50,531 किलोमीटर इतक्या अंतरावरून हे अशनी जातील.

आज पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या अशनी धोकादायक मानल्या गेलेल्या नाहीत.

धोकादायक अशनी कोणती?

पण ११ डिसेंबरला पृथ्वी जवळून जाणारा एक अशनी मात्र धोकादायक मानला गेला आहे. 4660 Nereus असे या अशनीचे नाव असून त्याची रुंदी 330 मीटर इतकी आहे. पृथ्वीपासून या अशनीचे अंतर 39,34,424 किलोमीटर इतके आहे.

हेही वाचा

पाहा व्हिडिओ – 

Back to top button