पीएम नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला गुंतवणुकीत नंबर वन बनविले : अमित शहा | पुढारी

पीएम नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला गुंतवणुकीत नंबर वन बनविले : अमित शहा

अकोला, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या देशातील दहा वर्षांच्या राजवटीचा विचार झाल्यास केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार पवार असताना महाराष्ट्राला काँग्रेसने 1 लाख 91 हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, भाजपा सरकारने महाराष्ट्राला 7 लाख 15 हजार कोटीं रुपयांचा निधी दिला. या व्यतिरिक्त रस्ते बांधकाम, रेल्वे विकास आणि एअरपोर्टचा विकास घडवून आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणुकीत महाराष्ट्राला नंबर वन बनवले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ अकोला येथे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

अमित शहा पुधे म्हणाले की, भाजपा सरकारने युवक, महिला, शेतकरी मागासवर्गीय, आदिवासी, दलितांचा फायदा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटविले. देशातून दहशतवाद समाप्त करण्याचे काम मोदीजी करीत आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला सहन न करता आतंकवाद्यांचा सफाया करण्यात आला होता. भाजप सरकारने दहा वर्षात गरिबांचे कल्याण केले. 80 कोटी गरिबांना प्रतिमाहा पाच किलो धान्य मोफत दिले. यासोबतच घर, गॅस, नळ कनेक्शन आणि पाच लाखापर्यंतची आरोग्य सेवा मोदी सरकारने मोफत दिली. पुढच्या काळात गॅस सिलेंडर भरून आणण्याची वेळ येणार नाही. गॅस सिलेंडर करिता पाईपने गॅस पाठवण्याची व्यवस्था मोदी सरकार करेल. काँग्रेसकडून सतत आरक्षणाची भीती दाखवण्यात येत आहे. परंतु, यापूर्वी सुद्धा आम्ही पूर्ण बहुमताचा उपयोग कलम 370, तीन तलाक आणि आतंकवाद हटविण्यासाठी केला. आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात सिंचनाची सोय करणारी योजना राबवण्यात येणार आहे. ज्यामुळे येथील चार लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. अकोलाचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना विजय करा. मोदीजींना साथ देत त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्या करता कमळ चिन्हाचे बटन इतक्या जोराने दाबा की करंट इटलीपर्यंत गेला पाहिजे, असे आवाहन अमित शहा यांनी केले. काँग्रेसने नेहमीच मतांचे राजकारण केले. या राजकीय खेळात त्यांनी नागरिकांच्या विकास कामांकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Back to top button