शेअर बाजारात आठवड्याची दमदार सुरुवात, सेन्सेक्सने घेतली ४०० अंकांची उसळी | पुढारी

शेअर बाजारात आठवड्याची दमदार सुरुवात, सेन्सेक्सने घेतली ४०० अंकांची उसळी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारपेठांमधील सकारात्‍मक संकेताचे परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर उमटले. आज (दि.२२ एप्रिल) आवठड्याच्‍या पहिल्‍या दिवशी व्‍यवहारांची दमदार सुरुवात झाली. सेन्सेक्स ४५० अंकांनी उसळी घेत ७३,५५० वर व्यवहार करत आहे. निफ्टीही १५०अंकांच्या तेजीसह २२,३०० अकांवर व्यवहार करत आहे. दरम्‍यान, शुक्रवारी( दि. १९) सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 73,088 वर बंद झाला होता.

धातू, औषध आणि बॅकिंग क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे बाजारात उत्‍साहाचे वातावरण पाहिला मिळत आहे.  व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी. निफ्टीमध्ये सुरुवातीच्या काळात 100 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली. बाजाराच्या सुरुवातीला निफ्टीचे जवळपास सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. निफ्टी बँक जवळपास 0.67 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 0.57 टक्के, निफ्टी पीएसयू, 1.27 टक्के, निफ्टी आयटी 0.14 टक्के, निफ्टी एफएमसीजी 0.58 टक्के, निफ्टी मेटल 1.20 टक्के, निफ्टी फार्मा 1 टक्के आणि निफ्टी रियल्टी इंडेक्स 1.46 टक्के वाढीसह व्यवहार करताना दिसून आले.

Back to top button