Rashmika Mandanna : पुष्पाच्या श्रीवल्लीचा नवा लूक व्हायरल, नव्या पोझमध्ये दिसली रश्मिका… | पुढारी

Rashmika Mandanna : पुष्पाच्या श्रीवल्लीचा नवा लूक व्हायरल, नव्या पोझमध्ये दिसली रश्मिका...

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा २ सीक्वेल येत असून या चित्रपटातील श्रीवल्लीचा नवा लूक व्हायरल झाला आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पाराजच्या भूमिकेत तर रश्मिका मंदान्ना श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. आता निर्मात्यांनी श्रीवल्लीचा नवा लूक शेअर केला आहे. (Rashmika Mandanna) या लूकमध्ये रश्मिका गळ्यात ढिगभर दागिने, नाकात नथ, केसात सिंदूर अशा लूकमध्ये एक पोझ देताना दिसतेय. हिरवी साडी, कंबरपट्टा, दागिने आणि तिला शोभेल असा साधा मेकअप अशा परिपूर्ण लूकमध्ये ती पोस्टरमध्ये दिसते. (Rashmika Mandanna)

पुष्पा या पहिल्या भागात दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती तर रश्मिका -अल्लू अर्जुनवर चित्रीत करण्यात आलेले गाणे सामी-सामी देखील सुपरहिट ठरले. पुष्पा : द राईजच्या रिलीजच्या तीन वर्षांनंतर आता निर्माते या चित्रपटाचा सिक्वेल पुष्पा २ : द रूल घेऊन येत आहेत.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे अल्लू अर्जुनचे नवे पोस्टर रिलीज झाले होते. या पोस्टरमध्ये पायात घुंगरू अशल्याचे दिसत होते. रश्मिका मंदानाचा आज ५ एप्रिल २०२४ रोजी वाढदिवस आहे. चाहते रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर निर्मात्यांनी रश्मिकाचा अर्थात श्रीवल्लीचा नवा लूक व्हायरल होत आहे.

पुष्पा २ च्या निर्मात्यांनी श्रीवल्लीला दिल्या शुभेच्छा

रश्मिका मंदानाचा पोस्टर शेअर केल्यानंतर निर्मात्यांनी लिहिलं, “देशाची धडकन श्रीवल्लीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”. अल्लू अर्जुन – रश्मिका मंदाना चित्रपट ‘पुष्पा-२’ चे टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला रिलीज केला जाईल.

Back to top button