दलित पँथर संघटनेचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा | पुढारी

दलित पँथर संघटनेचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दलित पँथर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे, अशी माहिती दलित पँथर संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी आज (दि.४ ) दिली.

पाठिंब्याचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात दलित पँथर संघटनेचे कार्यकर्ते राज्यभर काम करतील. व राष्ट्रवादीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी पूर्णपणे ताकदीने प्रचार करतील, असे सोनवणे म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button