PM Modi Bill Gates | ‘ज्या गोष्टी सोप्या मानतो, त्या तिथेच अपयशी ठरतात’ : बिल गेट्स | पुढारी

PM Modi Bill Gates | ‘ज्या गोष्टी सोप्या मानतो, त्या तिथेच अपयशी ठरतात' : बिल गेट्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे भारत दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये मुख्यतः तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) चर्चा झाली. यावेळी पीएम मोदी यांनी AI वर विश्वास ठेवणे धोकादायक असू शकते, असे मत व्यक्त केले. याला उत्तर देताना, AI चे हे सुरुवातीचे दिवस असून, ज्या गोष्टी सोप्या मानल्या जातात तिथेच त्या अपयशी ठरतात, असे मत बिल गेट्स यांनी व्यक्त केले. (PM Modi Bill Gates)

पुढे AI संदर्भातील पीएम मोदींसोबतच्या चर्चेत बोलताना बिल गेट्स म्हणाले की, ‘AI चे हे सुरुवातीचे दिवस आहेत. ज्या गोष्टी तुम्ही अवघड समजता त्या सोप्या होतील पण ज्या गोष्टी तुम्ही सोप्या मानता त्या तिथेच अपयशी ठरतील, असेदेखील स्पष्ट केले. (PM Modi Bill Gates)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना दिलेल्या मुलाखतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पासून डिजिटल पेमेंटपर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी पीएम मोदी म्हणाले, ‘मी टेक एक्सपर्ट नाही, पण AI बाबत माझ्यात मुलांसारखी उत्सुकता आणि जिज्ञासा आहे’, असे देखील म्हणाले. (PM Modi Bill Gates)

AI वर विश्वास ठेवणे धोकादायक- पंतप्रधान मोदी

या चर्चेदरम्यान पीएम मोदी म्हणाले की, एआयचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते जेव्हा ते प्रशिक्षणाशिवाय एखाद्याला वापरण्यास दिले जाते. पंतप्रधानांनी एआय-व्युत्पन्न सामग्रीवर स्पष्ट वॉटरमार्कसह प्रारंभ करण्याचे सुचवले. जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. ते म्हणाले की, भारतासारख्या लोकशाही देशात कोणीही डीपफेक वापरू शकतो. त्यामुळे जर तुम्ही आळशीपणामुळे एआयवर अवलंबून असाल तर ते चुकीचे आहे. आता आपल्याला एआयच्या पुढे जावे लागेल आणि चॅट जीपीटीशी स्पर्धा करावी लागेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

Back to top button