चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त अनुयायी महाडमध्ये दाखल | पुढारी

चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त अनुयायी महाडमध्ये दाखल

श्रीकृष्ण दबाळ

महाड (रायगड) : पुढारी वृत्तसेवा – ९७ वर्षांपूर्वी समाजात असलेल्या अस्पृश्यतेला दूर करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाचा ९७ वा वर्धापन दिन आज महाडमध्ये झाला. लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीत हा दिन संपन्न होत आहे. आज सकाळी ९ वाजता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महाडचे आमदार भरत शेठ गोगावले आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

चवदार तळे येथील स्मारकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पोलीस दलाने मानवंदना दिली. या पक्षात महाडमधील विविध सामाजिक संस्था तसेच डॉक्टर आंबेडकर अनुयायांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिवसभर करण्यात आले आहे.

आज उस्फूर्तपणे नगरपालिका प्रशासकीय इमारतीपासून सकाळी दहा वाजता मिरवणूक काढली होती. यामध्ये महाड मधील विविध सामाजिक संस्था. राजकीय पक्षांचे प्रमुख. पदाधिकारी सहभागी झाले होते. २० मार्च, १९२७ रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाच्या पूर्वीच्या या महाड मधील नागरिकांच्या कार्यपूर्तीचे स्मरण व्हावे म्हणून या वर्षापासून यासंदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती चवदार तळे विचार मंचच्या वतीने याप्रसंगी देण्यात आली.

चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण सुशोभीकरण आणि चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्याकरिता अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला असलेल्या संकल्पनेनुसार महाडमध्ये देखील ती योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती आमदार भरत शेठ गोगावले यांनी याप्रसंगी दिली. आज सायंकाळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले महाडमध्ये येणार आहेत.

Back to top button