ओल्या मातीने घर तयार करणारे पक्षी | पुढारी

ओल्या मातीने घर तयार करणारे पक्षी

लंडन : आतापर्यंत गवताच्या काड्यांनी घरे बनवणारे अनेक पक्षी आपण पाहिलेले असतात. जिथे सुरक्षित जागा मिळेल, अशा ठिकाणी गवताच्या काड्यांपासून सुबक कलाकृतीसारखे सजलेली घरे अर्थातच लक्ष वेधून घेत असतात. मात्र, काही युरोपियन, आफ्रिकन पक्षी असेही असतात, जे अगदी ओली माती व तोंडातील लाळेच्या माध्यमातूनही आपली घरे तयार करतात.

ही घरे बर्‍याचदा भिंतीवर साकारलेली असतात. ही घरे इतकी मजबूत असतात की, एकवेळ त्याचे प्लास्टिक उखडून गेले तरी या घरांना अजिबात धक्का लागत नाही. दक्षिण आफ्रिका व युरोपमधून येणारे हे पक्षी अबॅबिल नावाने ओळखले जातात. असे हे पक्षी 9 महिन्यांच्या भारत भ—मंतीवर येतात, असे अभ्यासक म्हणतात.

सध्या ताप्ती नदीच्या बि—टिशकालीन छोट्या पुलावर अशी अनेक घरटी दिसून येत आहेत. या पक्ष्यांनी येथे जणू वसाहतच केल्याचे येथे दिसून येते आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पक्षी येथे येतात आणि मार्चपर्यंत त्यांचे वास्तव्य असते. हे पक्षी एका तासात जवळपास 50 किलोमीटर्स वेगाने अंतर कापू शकतात. दिवसाकाठी 300 ते 400 किलोमीटर्सचे अंतर पार करण्याची या पक्ष्यांची क्षमता असते.

Back to top button