कोणाला, कशासाठी वाचविले? सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला  | पुढारी

कोणाला, कशासाठी वाचविले? सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला 

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘मोक्का’ संबंधीच्या वक्तव्याचे उत्तर मिळाले पाहिजे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. शुक्रवारी त्या बारामतीत पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या की, खरे तर ही बाब धक्कादायक आहे. हे कोणाबद्दल होतं, कोणाला मोक्का लागला, कशासाठी मोक्का लागला, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, याबाबत सर्वांनाच उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे. त्यामुळे याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

…म्हणून मी एक पाऊल मागे घेतले

यापूर्वी कोणीही माझ्याकडे आले तरी मी त्यांना म्हणायचे, आपण दादांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊ. दादांच्या कामात ढवळाढवळ नको म्हणून मी एक पाऊल मागे घ्यायची. ते माझे मोठे भाऊ आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने बारामतीची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. त्यामुळे जेव्हा कोणताही प्रश्न आला तेव्हा मी त्यांच्या कामात ढवळाढवळ नको, अशी भूमिका घेत एक पाऊल मागे घेत मानसन्मान करायचे, असे सुळे यांनी सांगितले. गेली पंधरा वर्षे त्यांच्याच विचाराचा खासदार होता ना? आता कोणता बदल होणार?, असा सवाल केला.

हेही वाचा

Back to top button