Bharat Shakti Exercise : युद्धसरावाचा निनाद जगभर | पुढारी

Bharat Shakti Exercise : युद्धसरावाचा निनाद जगभर

पोखरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 देशांतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांसमेवत पोखरणमधील भारत शक्ती 2024 युद्धाभ्यासाअंतर्गत संरक्षण दलाच्या थरारक कवायतींची अनुभूती घेतली. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या धाडसी कवायतींमधून भारताच्या सामर्थ्यांचा निनाद जगभर घुमल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

Bharat Shakti Exercise : स्वदेशी बनावटीच्या शस्त्रसामग्रींचे प्रदर्शन

या सरावामध्ये स्वदेशी बनावटीच्या शस्त्रसामग्रींचा समावेश करण्यात आला होता. जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही भागातून शत्रूला आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता या प्रदर्शनातून अधोरेखित करण्यात आली.

Bharat Shakti Exercise : 50 मिनिटांचा थरार 

पोखरणच्या रणभूमीवर 50 मिनिटे या कसरती सुरू होत्या. आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याची प्रचिती पोखरणमधील संरक्षण दलाच्या कवायतीमधून आल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

Bharat Shakti Exercise : नव्या भारताचे दर्शन 

जवानांच्या धाडसी कवायती पाहून आत्मनिर्भरतेचे खात्री झाली. पोखरणमधून संरक्षण दलाच्या कवायतीमधून घुमणार्‍या आवाजामधून नव्या भारताची अनुभूती आल्याचे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

 1,00,000 कोटी 

संरक्षण सामग्रीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. संरक्षणावरील खर्चामध्ये दुपटीने तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद एक लाख कोटींवर गेली आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

1800 कोटी 

10 वर्षांत 150 संरक्षण स्टार्टअप सुरू करण्यात आले आहेत. संरक्षण दलाच्या वतीने या कंपन्यांना 1800 कोटींच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत.

7,000 कोटी 

संरक्षण मार्गिकेसाठी (डिफेन्स कॉरिडॉर) सात हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये हे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत.

Back to top button