Aircraft Accident: राजस्थानमध्ये हवाई दलाच्या ‘तेजस’ लढाऊ विमानाला अपघात | पुढारी

Aircraft Accident: राजस्थानमध्ये हवाई दलाच्या 'तेजस' लढाऊ विमानाला अपघात

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानमधील जैसलमेरमध्ये वाळवंटात भारतीय हवाई दलाच्या  ‘तेजस’ विमानाला अपघात झाला आहे. राजस्थानमधील  पोखरण फायरिंग रेंजवर ३० देशांचा युद्ध अभ्यास आणि कवायती सुरू आहेत. दरम्यान  ही विमान दुर्घटना आज (दि.१२) दुपारी घडली. हवाई दलाने एक निवेदन जारी करून या विमान अपघाताची माहिती दिली आहे. या अपघातात विमानातील पायलट जखमी झाला असून, तो सुरक्षित असल्याचे वृत्त ‘ANI’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Aircraft Accident) 

भारतीय हवाई दलाचे हलके लढाऊ विमान (LCA) तेजस आज जैसलमेरजवळ एका ऑपरेशनल ट्रेनिंग सोर्टी दरम्यान क्रॅश झाले. पायलट सुखरूप बाहेर पडला आहे. मात्र याअपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत, असे देखील वृत्तात म्हटले आहे. 

‘या’ दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

जैसलमेर शहराच्या मध्यभागी जवाहर कॉलनीजवळ लोकवस्तीत हे लष्कराचे ‘तेजस’ लढाऊ विमान आगीच्या गोळ्यासारखे कोसळले. फायटर प्लेनने एका हॉस्टेललाही धडक दिली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हे लष्करी विमान कोसळल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बचाव पथकाला आगीवर नियंत्रण मिळवण्यातयश आले आहे. विमान कोसळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दरम्यान दूरवर धुराचे लोटही पसरलेले दिसत होते.

PM मोदी पोखरण फायरिंग रेंजवर पोहचण्यापूर्वीच अपघात

‘भारत शक्ती’ पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी दाखल झाले आहेत. हा अपघात अशा वेळी घडला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ‘भारत शक्ती’ सराव पाहण्यासाठी राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंजवर पोहोचले होते. या सराव दरम्यान, तिन्ही सैन्याच्या स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उपकरणांचे सामर्थ्य दाखवण्यात आले. यानंतर पीएम मोदींनी तिन्ही दलातील सैन्याला संबोधित केले. 

हे ही वाचा:

Back to top button