Coconut Farming Igatpuri : केळी व हळद शेतीच्या यशस्वी प्रयोगानंतर इगतपुरीत आता नारळाची लागवड | पुढारी

Coconut Farming Igatpuri : केळी व हळद शेतीच्या यशस्वी प्रयोगानंतर इगतपुरीत आता नारळाची लागवड

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- नारळाची झाडे साधारणपणे समुद्र किनारपट्टीवर आढळतात. कोकणात डोंगरउतारावरील जमिनीत पाण्याची सोय आहे तेथे नारळाची यशस्वी लागवड होऊ शकते. आता ती पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातही दिसू लागली आहेत. यशस्वी उत्पादन व इगतपुरीच्या हवामानास योग्य ठरतील, अशा तीन जातीच्या यशस्वी नारळाची लागवड इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्यचे शेतकरी राधारमन दवते यांनी केली आहे. इगतपुरी तालुक्यात आजवर नारळ शेतीचा हा पहिलाच प्रयोग आहे. (Coconut Farming Igatpuri)

इगतपुरी तालुक्यात प्रामुख्याने पारंपारिक भात शेती केली जाते. आता बागायती पिकेही शेतकरी घेऊ लागले आहेत. त्यामध्ये टमॅटो, भेंडी, मिर्ची, काकडी, प्लावर, कोबी, कारले, गिलके, दोडके आदी पिकांचा समावेश होतो. मात्र येथे दवते यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रयोग म्हणून केलेली केळी, हळद यांची लागवडही अत्यंत यशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्यांचा नारळ लागवडीचा प्रयोगही निश्चितच यशस्वी होईल असे बोलले जात आहे. (Coconut Farming Igatpuri)

नारळ लागवडीत पाण्याच्या व्यवस्थापनासह पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अभ्यास करून, काही बागांना भेटी देऊन व नारळ संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी बोलून नाशिक जिल्ह्यात लागवड करण्याचे ठरविले होते.
-राधारमन दवते, शेतकरी

राधारमण दवते यांनी केंद्र सरकारच्या कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डच्या उपसंचालक आणि रत्नागिरी येथील राज्य शासनाच्या कोकण संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने तीन जातींच्या नारळाची यशस्वी लागवड केली आहे. सर्वात उंच जातीचे ‘प्रताप’या मध्यम गोल नारळ देणाऱ्या माडाची, तर दुसरे ‘टीडी’ या मध्यम उंचीच्या संकरित जातीची आणि ‘गंगाबोडम’ या बुटक्या जातीची लागवडीसाठी निवड केली आहे. इगतपुरीच्या हवामानस पुरक ठरतील अशा तीन जातींची लागवड त्यांनी सध्या केली आहे.

केळी व नारळ ही परस्परपूरक पिके आहेत. केळीत भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला ‘फॉस्फेट’ हा घटक नारळाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असतो. त्याशिवाय अद्रक, पपई, अननस आदी आंतरपिके घेताना मनुष्यबळ असले, तर भाजीपाला पिकेही घेता येतात. भविष्यात कोकणात येणारी व कायमस्वरुपी उत्पन्न देणारी दालचिनी, मिरी, जायफळ आदी मसाले पिके लागवडीचा इरादा असल्याचे श्री. दवते यांनी सांगितले.

त्यामुळे नारळ लागवडीचे अंतर इतर आंतरपिकासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. त्यामुळे कोरड्या हवामानात यशस्वी ठरलेली पिकांची लागवड नारळांमधील पट्ट्यात केली जाऊ शकते.

हेही वाचा :

Back to top button