‘या’ देशात होतात सर्वाधिक घटस्फोट | पुढारी

‘या’ देशात होतात सर्वाधिक घटस्फोट

लंडन : आपल्याकडे लग्नाला ‘साता जन्माची गाठ’ मानले जाते. अर्थात, तरीही विविध कारणांमुळे लोकांचे घटस्फोट होतच असतात. मात्र, भारतात केवळ 1 टक्का लोकच घटस्फोट घेतात. जगात असे काही देश आहेत जिथे घटस्फोटांची संख्या सर्वाधिक आहे. जगात सर्वाधिक घटस्फोट होण्याच्या बाबतीत पोर्तुगाल पहिल्या क्रमांकावर आहे. येथे 94 टक्के लोक घटस्फोट घेतात.

घटस्फोट होण्याच्या बाबतीत स्पेन दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे 85 टक्के प्रकरणांमध्ये घटस्फोट घेतला जातो. सर्वात जास्त घटस्फोट होणार्‍या देशात युरोपीय देश लक्झेमबर्ग तिसर्‍या क्रमांकावर आहे. येथे 79 टक्के लोक घटस्फोट घेतात. रशियामध्ये सर्वात जास्त घटस्फोट होणार्‍या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. येथे 73 टक्के लोक घटस्फोट घेतात. याबाबतीत युक्रेन पाचव्या क्रमांकावर आहे. येथे सुमारे 70 टक्के लोक घटस्फोट घेतात.

कॅरेबियन देश क्युबा घटस्फोटाच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे. येथे 55 टक्के लोक घटस्फोट घेतात. फिनलंड घटस्फोटाच्या बाबतीत 7 व्या क्रमांकावर आहे. येथे सुमारे 55 टक्के लोक घटस्फोट घेतात. सर्वाधिक घटस्फोट होणार्‍या देशांच्या बाबतीत बेल्जियम आठव्या क्रमांकावर आहे. येथे 53 टक्के लोक घटस्फोट घेतात. प्रेमाचा देश म्हणून ओळख असलेला फ्रान्स हा देश घटस्फोटाच्या बाबतीत 9 व्या क्रमांकावर आहे. येथे 51 टक्के लोक घटस्फोट घेतात.

Back to top button