NCPSP | सावध ऐका पुढल्या हाका; 'तुतारी' चिन्हावर सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत
पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाने हे चिन्ह देण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वारण्याचे आदेश देण्यात आले आहे. ‘तुतारी’ पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, ” महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.” (NCPSP)
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार
रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज : सुप्रिया सुळे
‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी कवी केशवसूत यांची कविता शेअर करत आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे, “नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. ही तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते. महाराष्ट्राला झुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘महाराष्ट्रद्रोही’ प्रवृत्ती, तरुणांचे रोजगार शेजारच्या राज्याच्या झोळीत अलगद नेऊन टाकणारे आणि राज्याचा सामाजिक सलोखा ढळावा यासाठी सतत काम करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात संघर्ष करण्याची हाक ही तुतारी देते. मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी शेतकरी आणि महिलांचा सन्मान व महाराष्ट्राचा स्वाभिमान या त्रिसूत्रीचा अवलंब करुन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कवीवर्य केशवसूत म्हणतात त्याप्रमाणे – ‘हल्ला करण्या ह्या दंभावर, ह्या बंडावर शुरांनो! या त्वरा करा रे! समतेचा ध्वज उंच धरा रे! नीतीची द्वाही पसरा रे! तुतारीच्या ह्या सुराबरोबर’ सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडऊनी!”
NCPSP : ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज…
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. हि तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते. महाराष्ट्राला झुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘महाराष्ट्रद्रोही’ प्रवृत्ती, तरुणांचे रोजगार शेजारच्या… pic.twitter.com/k9cqhTj6RP
— Supriya Sule (@supriya_sule) February 23, 2024
हेही वाचा
- Intuitive Machines | ५० वर्षांनंतर अमेरिकेचे खासगी मून लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले
- Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली
- ठाणे : गोएंका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सहलीदरम्यान विनयभंग; पालकांचे शाळेसमोर आंदोलन, तीन शिक्षकांसह कर्मचारी निलंबित