Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली | पुढारी

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज ४ वर्ष पूर्ण झाले. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये ४० CRPF जवान शहीद झाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ४ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. (Pulwama Attack) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भारत मातेच्या शूर पुत्रांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “पुलवामा येथे शहीद झालेल्या शूर वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची देशासाठी केलेली सेवा आणि त्याग सदैव स्मरणात राहील.”

Pulwama Attack : पुलवामा हल्ला

१४ फेब्रवारी २०१९ रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात CRPF चे ४० जवान दहशतवादी हल्‍ल्‍यात शहीद झाले होते. हा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जवानांनी भरलेल्या बसच्या ताफ्यावर धडक दिली. त्यामुळे बसचा स्फोट झाला. या भ्याड हल्यानंतर भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले करत चोख प्रत्‍युत्तर दिले होते.

हेही वाचा

Back to top button