Land for job scam | नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात राबडी देवी आणि त्यांच्या दोन मुलींना जामीन मंजूर | पुढारी

Land for job scam | नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात राबडी देवी आणि त्यांच्या दोन मुलींना जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन : सरकारी नोकरीच्या बदल्यात जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांच्या दोन मुली मीसा भारती आणि हेमा यादव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी राबडी देवी आणि त्यांची मुलगी मीसा भारती दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर राहिल्या होत्या. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. या प्रकरणी राबडी देवींना दिलासा मिळाला आहे.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने सांगितले की, अंमलबजावणी संचालनालयाने जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयितांना अटक करण्यात आली नसली तरी औपचारिक उत्तराची गरज भासू शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर संशयितांच्या वकिलांनी ते जामीन मिळण्यास पात्र असल्याचे सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राबडी देवी आणि त्यांची मुलगी मीसा भारती दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात जाताना दिसत आहेत.

३० जानेवारी रोजी सीबीआयने न्यायालयाला सांगितले होते की ते लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध रेल्वेमध्ये नोकरीसाठी केलेल्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात एका महिन्याच्या आत पुरवणी आरोपपत्र दाखल करेल. फेब्रुवारीच्या अखेरीस अंतिम अहवाल दाखल केला जाईल, असेही सीबीआयने सांगितले होते.

हे ही वाचा :


Back to top button