UP Farmers Protest | शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांनी रोखले! दिल्ली-नोएडा सीमा सील, कलम १४४ लागू | पुढारी

UP Farmers Protest | शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांनी रोखले! दिल्ली-नोएडा सीमा सील, कलम १४४ लागू

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईच्या मागणीसाठी आज (दि.८) थेट संसदेच्या दिशेने चाल केली. मात्र शेतकऱ्यांचा हा मोर्चा नोएडा- दिल्लीच्या हद्दीत पोहचताच, पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रोखला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नोएडा- दिल्ली परिसरात कलम १४४ लागू केले आहे. असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (UP Farmers Protest)

शेतीच्या वाढीव नुकसान भरपाईसह विविध मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील हे शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांचा मोर्चा संसदेकडे वाटचाल करत असतानाच, नोएडा येथे रोखण्यात आला. त्यामुळे दिल्ली-नोएडा सीमेवरच हा मोर्चा ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली-नोएडा, चिल्ला सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकरी नेत्यांना त्यांच्या निवासस्थानीच पाळत ठेवण्यात आली आहे. (UP Farmers Protest)

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ली-नोएडा चिल्ला सीमेवरून संसदेच्या दिशेने मोर्चा काढला. नोएडा ते दिल्लीचा मार्ग शेतकऱ्यांनी रोखला. महामाया उड्डाणपुलाखाली हजारो शेतकरी जमले आहेत. हजारो शेतकरी दिल्लीला जाण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत हेही निदर्शनात सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. (UP Farmers Protest)

हेही वाचा:

Back to top button