ठाणे-मुलुंडदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक; शनिवारीपासून लोकल, मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल | पुढारी

ठाणे-मुलुंडदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक; शनिवारीपासून लोकल, मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा :  मुलुंड स्थानकातील जुना पादचारी पुल तोडण्यासाठी शनिवारी 3 फेब्रुवारीच्या रात्री ठाणे ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत 5 तासांचा ब्लॉक असणार आहे. यादरम्यान लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल केले आहेत.

संबंधित बातम्या 

ब्लॉकदरम्यान रात्री 11 वाजून 18 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून डाऊन जलद मार्गावरील खोपोली ट्रेन विद्याविहार ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरुन वळविण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी येथून रात्री 9 वाजून 54 मिनिटांनी सुटणारी कल्याण आणि कल्याण स्थानकातून रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सुपरफास्ट मेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर एक्सप्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बनारस महानगरी एक्सप्रेस या गाड्या विद्याविहार ते ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरुन वळविण्यात येणार असल्याने 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.

मुंबईत येणार्‍या भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस, हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल, मंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, हैदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेन सागर एक्सप्रेस आणि गदग-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस कल्याण/ठाणे ते विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरुन धावणार आहेत.

Back to top button