पणजी : ५.६ कोटींच्या लॉटरीचे आमिष दाखवून महिलेला घातला २५ लाखांचा गंडा | पुढारी

पणजी : ५.६ कोटींच्या लॉटरीचे आमिष दाखवून महिलेला घातला २५ लाखांचा गंडा

पणजी : पुढारी वृत्तसेवा लॉटरीच्या आमिषापोटी थिवी येथील एका महिलेने २५ लाख रुपये गमावले. आपण एसबीआय बँकेचा अधिकारी आहे आणि आपणास दुबई फाऊंडेशनची ५ कोटी ६० लाख रुपयांची लॉटरी लागली असे सांगून धीरजकुमार नावाच्या भामट्याने थिवी-बार्देश येथील जुलीया तेमुडा या महिलेला २५ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर गुन्हा विभागाने धीरज कुमार या कथित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धीरज कुमार याने १३ डिसेंबर २०२३ रोजी दरम्यान तक्रारदार महिलेशी संपर्क साधून मी एसबीआय बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच तिला दुबई फाऊंडेशनची ५ कोटी ६० लाख रुपयांची लॉटरी लागल्याची माहिती दिली. लॉटरीची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी एसबीआय बँकेच्या विविध खात्यांत रक्कम जमा करण्यास भाग पाडले. ती रक्कम २५ लाख एवढी आहे. त्यासाठी संशयिताने तक्रारदार महिलेशी विविध वॉट्सअप क्रमांकांवरून संपर्क साधला. ते सर्व नंबर तिने पोलिसांना दिले आहेत.

याची दखल घेऊन सायबर गुन्हा विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी भारतीय दंड संहितेच्या आणि आरडब्ल्यू आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :  

Back to top button