Budget 2024 : महाराष्ट्रात रेल्वेसाठी 15,554 कोटी रु.; कल्याण-कसारादरम्यान तिसरा रेल्वे मार्गासाठी तरतूद | पुढारी

Budget 2024 : महाराष्ट्रात रेल्वेसाठी 15,554 कोटी रु.; कल्याण-कसारादरम्यान तिसरा रेल्वे मार्गासाठी तरतूद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांकरिता तब्बल 15 हजार 554 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वर्ष गतर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 539 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या 250 किलोमीटरच्या नवीन मार्गिकेच्या कामासाठी यंदा 275 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. वर्धा ते नांदेड (व्हाया यवतमाळ-पसूद) या 270 किलोमीटरच्याही नवीन मार्गाला 300 कोटी रुपयांच्या निधीचे बळ दिले आहे. अमरावती ते नरखेड मार्गाला एक कोटी रुपये मिळाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे कल्याण ते कसारा दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी 85 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

पुणे ते मिरज दुहेरीकरणासाठी 200 कोटी रुपये, दौंड ते मनमाडसाठी दुहेरीकरणासाठी 300 कोटी रुपये यासह मनमाड ते जळगाव तीसरी मार्गिकेसाठी 120 कोटी यासह अन्य प्रकल्प व सोयिसुविधांसाठी काही निधी प्राप्त झाला आहे.

प्रकल्प आणि मिळालेला निधी

श्रनवीन रेल्वे लाईन : 1 हजार 941 कोटी
श्रअहमदनगर-बीड-परळी वैजनाथ 250 किमी : 275कोटी
श्रवर्धा-नांदेड (व्हाया यवतमाळ-पसुद) 270 किमी : 750 कोटी
श्रसोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापूर 84 किमी : 225 कोटी
श्रधुळे-नरखेडा 50 किमी : 350 कोटी
श्रकल्याण-मुरबाद व्हाया उल्हासनगर 28 किमी : 10 कोटी
श्रबारामती-लोणाड (54 किमी) : 330 कोटी
श्रफलटण-पंढरपूर 105 किमी : 1 कोटी

यार्ड रिमोल्डिंग

श्रकसारा : 1 कोटी
श्रकर्जत : 10 कोटी
श्रपुणे : 25 कोटी

गेज रुंपातर

श्रपाचोरा-जामनेर मार्ग : 300 कोटी
श्रएक्सलेटर (65) : 50 लाख
श्रबोरीवली स्थानकात पादचारी पुल : 13 लाख
श्रमरिन लाईन्स, चर्नी रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परेल, बांद्रा स्थानकात पादचारी पुल :
24 लाख
श्रलिफ्ट (70) : 13 कोटी 86 लाख

वाहतूक सुविधा

श्रपनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनल :
10 कोटी
श्रसीएसएमटी स्थानकातील प्लटफार्म क्रमांक 10 ते 13 ची लांबी वाढविणे : 10 कोटी
श्रएलटीटी टर्मिनस :
5 कोटी
पादचारी पूल,
रोड ओव्हर पूल
श्रविक्रोळी रोड ओव्हर
पुल : 5 कोटी
श्रदिवा रोड ओव्हर
पुल : 5 कोटी
श्रदिवा-वसई रोड
ओव्हर पुल : 9 कोटी
श्रदिवा-पनवेल रो़ड
ओव्हर पुल : 3 कोटी
श्रकल्याण-इगतपुरी
रोड ओव्हर पुल :
16.1 कोटी

दुहेरीकरण (3-4 था मार्ग)

श्रकल्याण-कसारा तिसरी लाईन (67.62 किमी) : 85 कोटी
श्रवर्धा-नागपूर तिसरी लाईन (76.3 किमी) : 124कोटी
श्रवर्धा-बल्हारशाह तिसरी लाईन (132किमी) : 200 कोटी
श्रईटारसी-नागपूर (280 किमी) : 320 कोटी
श्रपुणे-मीरज (467 किमी) : 200 कोटी
श्रदौण्ड-मनमाड (247.50 किमी) : 300कोटी
श्रवर्धा-नागपुर चौथी लाईन( 78.70 किमी) : 120 कोटी
श्रमनमाड-जळगाव तिसरी लाईन (160 किमी) : 120 कोटी
श्रजळगाव-भुसावळ चौथी लाईन (24 किमी) : 40 कोटी
श्रकर्जत-पनवेल चौथी लाईन : 10 कोटी

पश्चिम रेल्वेला 18 हजार 93 कोटी

अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेला 18 हजार 93 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात नवीन रेल्वे लाईन, दुहेरीकरणाकरिता 5 हजार 15 कोटी, रोड ओव्हर पुलाकरिता 1 हजार 196 कोटी, प्रवासी सुविधासाठी 1 हजार 135 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबई-दिल्ली मार्गावर गाड्यांचा वेग प्रतितास 160 ते 200 किलोमीटर वाढविण्यासाठी 2 हजार 662 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

मध्य रेल्वेला 10 हजार 611 कोटी

मध्य रेल्वेला यंदा 10 हजार 611 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षी 2023-24 मध्ये 11 हजार 600 कोटी रुपये निधी दिला होता. ट्रकची दुरुस्ती 1 हजार 22 कोटी, पुल-बोगदा 1 हजार 320 कोटी, सिग्नल यंत्रणा 183 कोटी, विद्युतीकरण प्रकल्प 338 कोटी.

Back to top button