Cylinder Blast in Chembur: चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घरात आग! ९ जखमी तर ३ जणांची प्रकृती गंभीर | पुढारी

Cylinder Blast in Chembur: चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घरात आग! ९ जखमी तर ३ जणांची प्रकृती गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील चेंबूर परिसरात सिद्धार्थ कॉलनीत घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीनंतर आग लागण्याची घटना गुरुवारी रात्री पावणे बाराच्या दरम्यान घडली. यामध्ये ९ जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर पालिकेच्या सायन व गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Cylinder Blast in Chembur)

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथे गायकवाड कुटूंबियांच्या घरात गॅस सिलेंडरच्या गळतीनंतर अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देताच काही मिनिटात अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तो पर्यंत स्थानिकांनी घरात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळविले. (Cylinder Blast in Chembur)

मात्र या आगीत यशोदा गायकवाड( ५६), संगीता गायकवाड(वय ५५), जितेंद्र कांबळे(४६), नर्मदा गायकवाड (६०), रमेश गायकवाड (५६), श्रेयस सोनकांबळे (१७), श्रेया गायकवाड (४०), ऋषभ गायकवाड (२३) आणि संदीप जाधव (४२) हे नऊ जण जखमी झाले आहेत. यातील यशोदा गायकवाड, नर्मदा गायकवाड व रमेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे. (Cylinder Blast in Chembur)

हेही वाचा:

Back to top button