किशोरी पेडणेकर, संदीप राऊत यांची आज पुन्हा ईडी चौकशी
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर कोविड घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत हे देखील बीएमसी खिचडी कोविड घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.
ईडी कार्यालयात जाण्याआधी संदीप राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर आरोप केला. “हा राजकीय हेतूने प्रेरित मुद्दा आहे. संजय राऊत भाजप विरोधात बोलत आहेत, त्यांना खाली खेचण्यासाठी हे केले जात आहे. राऊत कुटुंबावर दबाव आणण्यासाठी हे केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
#WATCH | Mumbai | Former Mumbai Mayor Kishori Pednekar arrives at the ED office for questioning in connection with the COVID body bag scam case. pic.twitter.com/DHA8s0JA0K
— ANI (@ANI) January 30, 2024
#WATCH | BMC Khichdi COVID scam case | Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut’s brother Sandeep Raut arrives at the ED office in Mumbai for questioning in connection with the matter. pic.twitter.com/CDeynfIiOZ
— ANI (@ANI) January 30, 2024
हेही वाचा :
- नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा
- ईडी छाप्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन नॉट रिचेबल; BMW कार जप्त
- …तर भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही : खासदार संजय राऊत